गडचांदूर :- शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी दलालां मार्फत विकु नये,यांचा गावात प्रवेश बंद करावा, ग्रामपंचायतने पुर्वीच ना-हरकत प्रमाणपत्र दिले मग उद्योग व जिल्हा प्रशासनाला या परियोजनेसाठी कशाची प्रतिक्षा आहे. स्थानिकांना रोजगार Employment to locals तसेच शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आपण सदैव त्यांच्या सोबत उभे राहू, शेतकऱ्यांना जमीनीचे एकरी भाव २५ लाख रुपये व प्रकल्पग्रस्तांना नोकरी मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री formal state home minister hansraj ahir हंसराज अहीर यांनी केले.ते परसोडा येथे आयोजित प्रकल्पग्रस्त गावांच्या महापंचायत Mahapanchayat सभेत अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
भाजपा कोरपना तालुकाध्यक्ष तथा जिल्हा उपाध्यक्ष नारायण हिवरकर,राजूरा तालुका महामंत्री प्रशांत घरोटे,जिल्हा सचिव विशाल गज्जलवार,सहकार आघाडी प्रमुख किशोर बावने,माजी सं.गा. नि.यो. अध्यक्ष संजय मुसळे,माजी सरपंच अरूण मडावी, पुरुषोत्तम भोंगळे,कवडू पा. जरिले,गडचांदूर न.प.नगरसेवक रामसेवक मोरे,नगरसेवक अरविंद डोहे,संदीप शेरकी, शशिकांत आडकीने,किशोर बावणे, प्रभाकर आत्राम,बेंडले,कार्तिकी गोंडलावार आदी मान्यवरांची सदर सभेत प्रमूख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.उध्वस्त झालेल्या पिकांची पाहणी करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी अहीर यांनी यावेळी केली.
तसेच शेततळ्यात बैलांना पाणी पाजण्यासाठी गेले असता बैलगाडी उलटून मरण पावलेल्या मांडवा येथील डाहुले दांपत्याला शासनाने त्वरित आर्थिक मदत द्यावी अशी मागणी करत स्वत: अहीर यांनी त्यांना आर्थिक मदत केली.सदर महापंचायत सभेत परिसरातील शेतकरी सखाराम तलांडे,पीतांबर कोंगुलवार,संजय सोलमवार,जयंत देवगडे,रामलू कुलबोईनवार,संतोष डोनेवार,रामलु बोईनवार आदी शेतकर्यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती. यानिमित्ताने उपस्थित शेतकऱ्यांनी समस्या मांडल्या.प्रास्ताविक नारायण हिवरकर,संचालन हरिदास पारखी तर आभार गंगाधर कुंटावार यांनी व्यक्त केले.
