प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - इंडिअन फारमर्स फर्टिलायझर को-आपरेटिव्ह लिमिटेड या राष्ट्रीय स्तरावरील सहकारी संस्थेमार्फत खत विक्रेता प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन ८/१०/२०२१ रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर.जी.बी.सदश इफको व संचालक आदर्श सहकारी शेतकी खरेदी विक्री सोसायटी मुल तथा कृषी उत्पन्न बाजार समिती मुल श्री. राजेंद्र कन्नमवार होते. रासायनिक नवीन तंत्रज्ञानानुसार शेतकऱ्यांसाठी नॅनो युरिया खत Nano urea fertilizer अतिशय उपयुक्त असून त्याचा अधिक वापर शेतकऱ्यांना करायला लावावे आणि खत विक्रेत्यांनी सुद्धा याचा प्रसार करावा असे अमूल्य मार्गदर्शन संचालक राजेंद्र कन्नमवार यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आदर्श सहकारी खरेदी विक्री सोसायटीचे सभापती श्री.पुरुषोत्तम भुरसे, इफको खताचे प्रमुख मार्गदर्शक चंद्रपूर कृषी विकास अधिकारी श्री.लक्ष्मीनारायण दोडके, एफकोचे राज्य विपन्नन प्रबंधक यु.आर.तिजारे, एम.आय.डी.सी. विभागीय व्यवस्थापक पी.एम.पेठे. जिल्हा मार्केटिंग अधिकारी श्री.गोगीरवार, जिल्हा पनन व्यवस्थापक ए. बी.चौधरी, गडचिरोली पनन व्यवस्थापक व्ही.ए. मामीडवार, उपस्थित होते. खत विक्रेत्याना नॅनो युरिया खत व पाश मशीन कशी उपयुक्त आणि फायदेशीर आहे याबाबत सविस्तर मार्गदर्शन प्रमुख मार्गदर्शक यांनी केले. कार्यक्रमाला जिल्ह्यातील असंख्य रासायनिक खत Chemical fertilizer विक्रेते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी एफकोचे क्षेत्रीय अधिकारी रितेश मालगर, क्षेत्रीय प्रतिनिधी सचिन सुपनर, क्षेत्र सहाय्यक अंकुश राठोड यांनी परिश्रम घेऊन सहकार्य केले.