चंद्रपूर - भारतीय जनता पार्टी चंद्रपूर महानगर तर्फे बंगाली कॅम्प येथे नुकतेच बंगाली समाज स्नेह मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आले, या वेळी भाजपा चंद्रपूर महानगर जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे यांनी बंगाली समाज आघाडीच्या कार्यकारिणीची घोषणा विधीमंडळाच्या लोकलेखा समीतीचे अध्यक्ष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार sudhir mungantiwar यांच्या समक्ष केली, सामाजिक कार्यकर्ते डॉ दिपक भट्टाचार्य यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच महामंत्री पदी मनोरंजन राॅय, चंदन पाल, कृष्णकांत पोद्दार, कृष्णा कुंडू व दिपक बिश्वास यांची तर उपाध्यक्षपदी सौ कविता सरकार, सुखेन्दु चक्रवर्ती, बलराम शहा, बिदेश शहा, डॉ सत्यजित पोद्दार,बिमल शहा, रमेश सरकार, निहार हलधर, डॉ नितीन बिश्वास यांची तर सचीवपदी सपन सरकार, किशोर बारई, प्रलय सरकार, प्रदिप बाला, अविनाश घरामी, सुजीत डाकुआ, पवित्र मंडल, रोहित बिश्वास, सुब्रतो बिश्वास, सुबीर समाद्दार, गुरुपद मंडल, पिजुश मंडल, आशु राय यांची नियुक्ती करण्यात आली. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांना आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रमाणपत्र व सिंहावलोकन पुस्तीका देण्यात आली. Bengali Samaj Aghadi
याप्रसंगी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, भाजपा महानगर जिल्हा अध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे, भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री देवराव भोंगळे, बल्लारपूर चे नगराध्यक्ष हरीश शर्मा, उपमहापौर राहुल पावडे, ज्येष्ठ नेते प्रमोद कडू, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी निमंत्रित सदस्य तुषार सोम, जिल्हा महानगर महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभुषण पाझारे, रवि गुरनूले, महानगर कोषाध्यक्ष प्रकाश धारणे, माजी महापौर सौ अंजलीताई घोटेकर, महानगरपालिकेच्या गटनेत्या सौ जयश्रीताई जुमडे, जिल्हा ग्रामीण महामंत्री नामदेव डाहुले, मंडल अध्यक्ष दिनकर सोमलकर, विठ्ठल डूकरे, रवि लोनकर, संदीप आगलावे, सचिन कोतपल्लीवार यांची उपस्थिती होती.