प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- उत्तरप्रदेश लखीमपुर खैरी प्रकरणात केन्द्रिय कृषी राज्यमंत्रि अजय मिश्रा यांच्या मुलास अटक दाखवुन रक्षण करण्याचे काम केन्द्र सरकार करित आहे. याचा निषेध भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी जि.प.अध्यक्ष कांग्रेस नेते संतोषसिंह रावत यांच्या नेतृत्वात केंद्र शासनाचा निषेध करुन गांधी चौकात नारेबाजी करुन धरणे आंदोलन करण्यात आले. व दोषींवर कडक कारवाई करुन फाशी द्यावे आणि केन्द्रीय कृषी राज्यमंत्री अजय मिश्रा यांना तात्काळ बडतर्फ करावे अशी मागणी भारताचे महामहिम राष्ट्रपती मान. रामनाथजी कोविद यांचेकडे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार यांच्या मार्फतीने नायब तहसीलदार श्री. पवार यांना लेखी निवेदन देऊन करण्यात आली. Lakhimpur khiri violence
मागील नऊ महिन्यापासून दिल्लीच्या सीमेवर शेतकरी तीन शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आंदोलन करीत आहेत हे आंदोलन दडपून टाकण्याच्या हेतुने केन्द्रीय कृषी राज्यमंत्री अजय मिश्रा यांचे सुपुत्र यांनी या आंदोलक शेतकरी यांच्यावर गाडी चालवून चिरडून आठ शेतकरी ठार झाले मात्र केन्द्र शासन तथा उत्तरप्रदेश शासन आरोपीला पाठीशी घालण्याचे काम करीत आहे. अशा हुकूमशाही केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. निषेध आंदोलनाचे व मोर्चाचे नेतृत्व कांग्रेस नेते व CDCC बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कांग्रेसचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक घनश्याम येनुरकर, जिल्हा कांग्रेसचे महासचिव व संचालक राकेश रत्नावार, उपसभापती संदीप कारमवार, संचालक राजेंद्र कन्नमवार, भेजगावचे सरपंच तथा कृषी बाजार समिती संचालक अखिल गांगरेड्डीवार, संचालक शांताराम कामडे, डाँ.पद्माकर लेनगुरे, किशोर घडसे, महिला कांग्रेस अध्यक्षा रुपाली संतोषवार, नगर सेविका ललिता फुलझेले, आदर्श खरेदी विक्री सोसायटीचे सभापती पुरुषोत्तम भुरसे, शहर कांग्रेस अध्यक्ष सुनील शेरकी, ओबीसी कांग्रेसचे अध्यक्ष गुरुदास चौधरी, युवक अध्यक्ष व्यंकटेश पुल्लकवार, माजी जि.प.सदस्य मंगला आत्राम, शहर उपाध्यक्ष संदीप मोहबे, विवेक मुत्यालवार, शहर कोषाध्यक्ष दिनेश जिद्दीवार, चंदू चतारे, राज मंदाडे,अन्वर शेख, अतुल बुरांडे,बंडू कोडापे, भूमिका मडावी, मंगला कुलसंगे, कल्याणी शेडमाके, नरेश गुडलावार, गणेश रणदिवे, जनार्धन भुरसे, वैशाली घुगरे, पंकज शेंडे, आकाश शेंडे, विनोद कामडी, नसीम शेख, वहिदा पठाण, शुभांगी कोतपल्लीवार, रुखमाबाई मडावी, कुसुम कुलसंगे, यांचेसह तालुक्यातील शेतकरी बांधव, तालुका व शहर कांग्रेसचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
