चंद्रपूर - लखीमपूर येथे केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात चालू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाने 8 शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडले.
मात्र या प्रकरणाची साधी दखलही देशाच्या पंतप्रधान यांनी घेतली नाही, या विरोधात महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद ची हाक पुकारली.
चंद्रपुरात आज महाराष्ट्र बंद दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली.
महाविकास आघाडी च्या वतीने आज चंद्रपुरात शिवसेना, राष्ट्रवादी व कांग्रेसच्या वतीने चंद्रपूर 100 टक्के बंद करण्यात आले.
बंद दरम्यान जिल्ह्याचे खासदार बाळू धानोरकर यांनी शहरात दुचाकी रॅली काढत सर्वांचे लक्ष वेधले.

