प्रतिनिधी/रमेश निषाद
बल्लारपूर - : युवक कांग्रेस प्रदेश अध्यक्ष सत्यजीत ताबे यांच्या आदेशनुसार व पूर्व सांसद नरेश पुगलिया यांच्या मार्गदर्शनाथ युवक कांग्रेस जिल्हा उपाध्यक्ष करण पुगलिया यांच्या नेतृत्वात बल्लारपुर विधानसभा युवक कांग्रेस अध्यक्ष चेतन गेडाम यांनी बस्ती विभाग महात्मा गांधी पुतल्या जवळ उत्तर प्रदेश मध्ये लखीमपुर खीरी या ठिकाणी शेतकऱ्यांचा नरसंहार केल्याप्रकरणी तसेच प्रियंका गांधी यांना अटक केल्याप्रकरणी युवक कॉंग्रेसच्या वतिने योगी सरकारच्या विरोधात निषेध करत आंदोलन करण्यात आले. Genocide
उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असतांना शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडुन नरसंहार करण्यात आला.
देशातील शेतकऱ्यांना उद्धवस्त करण्याचे धोरणच भाजपा सरकारने आखले असून शेतकरी संपविण्याचे पाप हे सरकार करीत आहे. तसेच काँग्रेस नेत्या सरचिटणीस प्रियंका गांधी priyanka gandhi लखीमपूर खीरी येथील पिडीत शेतकरी कुटुंबाला भेटण्यासाठी जात असतांना त्यांची अडवणूक केली. त्यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन केले आणि बेकायदेशीर अटक केली. भारतात लोकशाही असतांना हुकुमशाही करणारे उत्तर प्रदेश मधील योगी सरकार Yogi Government बरखास्त करण्यात यावे तसेच लखीमपुर खीरी गावात हिंसाचार करणाऱ्यांची चौकशी करून कठोर शासन करण्यात यावे, अशा मागणीसह या घटनेचा बल्लारपुर युवक काँग्रेस द्वारे जाहीर निषेध करण्यात आला. Lakhimpur kheri
यावेळी छोटू सिद्दीकी, सिकंदर, खान, शंकर महाकाली, कमलेश माकोड़े, रुपेश रामटेक अजहर शेख, सोहेल खान, संदीप नाक्षिणे, काशी मेगंवार, श्रीकांत गुजरकर,राहुल घुंगरुतकर,रोशन ढेगळे शैलेश लांजेवार,साई पांढरे, राजा केसकर, सोनू आमटे, आशिष ,मोहमद अहमद(M. D) आदर्श निर्मल, फैजल खान, नाईम अहमद भूरिया सेठ, रूपेश कुलमेथे, शाबीर शेख, नाजीम भाई, सलीम भाई, अक्षय पपुलवार, मुबीन शेख, अनिल, प्रमोद चिंतलवार यांच्यासह कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
