चंद्रपूर - रस्त्यावर चालणारे दुचाकी, तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी PUC महत्वाची असते, म्हणजेच Pollution Under Control याचा अर्थ प्रदूषण नियंत्रण सदर प्रमाणपत्र आपल्याला ऑनलाइन मध्ये सहज प्राप्त करता येते.
दुचाकी साठी 35 रुपये, तीनचाकी ऑटो करिता 70 रुपये, चारचाकी वाहन साठी 90 तर अवजड वाहनांसाठी 110 रुपये शासनामार्फत ठरविण्यात आले आहे, मात्र सदर दराच्या दुप्पट तिप्पट पैसे आकारण्याचे काम चंद्रपूर जिल्ह्यातील PUC केंद्रात सुरू आहे. Rto chandrapur
नागरिकांची होणारी लूट बघता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी सदर PUC केंद्राची चौकशी करून कारवाई करीत बंद पाडले.
आपलं वाहन प्रदूषण नियमांच्या अधीन आहे यासाठी हे PUC प्रमाणपत्र आपल्याला नाममात्र शुल्क आकारून दिल्या जाते, मात्र या संधीचा फायदा घेणारे अनेक आहे.
सदर प्रमाणपत्र हे ऑनलाइन जरी मिळत असलं तरी त्या प्रमाणपत्र वर सदर प्रत ही संगणकीकृत असल्याने यावर सही ची गरज नाही, मात्र PUC केंद्रातील संचालक त्या प्रमाणपत्रावर असलेली त्याची मूळ किंमत त्यावर शिक्का व सही मारतात, जेणेकरून प्रमाणपत्र कितीला नागरिकांना मिळते यावर आपल्या केंद्राचा शिक्का मारत त्यावर पडदा टाकण्याचं काम PUC केंद्र धारक अनेक दिवसापासून करीत आहे.
उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोरे यांनी जिल्ह्यातील PUC चा घोळ करणारे तब्बल 5 केंद्र बंद पडले ज्यामध्ये बालाजी PUC केंद्र, घुघुस रोड, श्री PUC केंद्र, चंद्रपूर, इको केअर एंटरप्राइजेस वरोरा, सनलाईन ऑनलाइन सर्व्हिसेस बल्लारपूर, शिव लहीरी PUC सेंटर राजुरा यांचा समावेश आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जर कुणी PUC सेंटर धारक नागरिकांची अश्याच प्रकारे लूट करीत असेल तर त्यांनी पुराव्यासाहित चंद्रपूर परिवहन कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी केलं आहे.
