▶️कोरपना :- पंतप्रधान आवास योजनेतंर्गत prime minister housing scheme गोरगरिब कुटुंबांना घरकुलाचा लाभ दिला जात आहे. याच श्रेणीत कोरपना येथील इतर लाभार्थ्यांबरोबर पुंडलीक कृषणाजी कारेकर व किशोर पुंडलीक कारेकर यांना घरकुल मंजूर झाले.परवानगी मिळाल्यानंतर यांनी घरांचे बांधकाम सुद्धा सुरू केले.बांधकाम जोता लेव्हल पर्यंत होऊन अनेक महिने लोटले परंतु अजूनही त्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झालेली नाही.यामुळे पुढील बांधकाम थांबले आहे. हा निव्वळ घरकुल gharkul लाभापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचे आरोप करत येत्या दहा दिवसात घरकुल बांधकाम अनुदानाची रक्कम न मिळाल्यास नगरपंचायत कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसणार ! असा इशारा या दोन्ही लाभार्थ्यांनी दिला आहे.
कारेकरांनी दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर असे की,पंतप्रधान आवास योजनेंतर्गत येथील अनेक लाभार्थ्यांना सन २०१८-१९ मध्ये घरकुल मंजूर होऊन बांधकाम सुरू झाले.पहिली व दुसरी किस्त कित्येकांच्या बँक bank account खात्यात जमा सुद्धा झाली. परंतु किशोर व पुंडलीक कारेकर या दोन्ही लाभार्थ्यांना पहिल्या टप्प्याची किस्त अजूनही मिळालेली नाही.नगरप्रशासन अनेक कारणे पुढे करून अधिकारापासून वंचित ठेवत असल्याचे आरोप करत काही विरोधकांच्या खोट्या तक्रारीवरून नगरपंचायत घरकुल बांधकामाचे अनुदान देत नसल्याची खंत या दोन्ही कारेकरांनी व्यक्त केली आहे.सदर रक्कम खात्यात जमा न झाल्याने मोठ्याप्रमाणात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असून घरकुलाचे काम ठप्प पडल्याने संसार उघड्यावर पडला आहे.असे असताना आपला अधिकार मिळवून घेण्यासाठी नाईलाजास्तव आमरण उपोषणाचे हत्यार हाती घ्यावे लागत असल्याचे निवेदनात नमूद करत दहा दिवसात घरकुल बांधकामाची रक्कम बँक खात्यात जमा करा अन्यथा नगरपंचायत कार्यालयापुढे आमरण उपोषणास बसण्याचा इशारा किशोर कारेकर व पुंडलीक कारेकर यांनी मुख्याधिकारी यांना निवेदनातून दिला आहे.जिल्हाधिकारी चंद्रपूर,पोलीस निरीक्षक कोरपना यांनाही निवेदनातून याविषयीची माहिती देण्यात आल्याचे कळते.
-------------//----------
"कारेकरांविरोधात तक्रार"
सईबाई कोल्हे वय वर्ष अंदाजे ८० यांची कोरपना येथे वडिलोपार्जित घर व जमीन आहे.त्यांच्या शेजारी व घरासमोर राहणारे किशोर कारेकर आणि पुंडलीक कारेकर यांनी पंतप्रधान आवास योजनेत मिळालेल्या घराच्या कामात दोघांमधील तीन फुटाची गल्ली सोडली नसून जोता बांधकाम ही झालेला आहे.ते बांधकाम तोडून गल्ली कायम करून द्यावी.यानंतरच यांना घरकुल योजनेचे धनादेश द्यावे अशी लेखी तक्रार सईबाईंनी नगरपंचायतीकडे केली आहे.याची दखल न घेतल्यास येत्या १५ आक्टोंबर पासून न.प.समोर उपोषणाचा इशारा दिला आहे.
-----------//----------
"लोकांना पडलेले प्रश्न"
कारेकर आणि सईबाई या दोघांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.मात्र एक प्रश्न पडतो की सईबाईंनी खरोखरच उपोषणाचा निर्णय घेतला असेल का ? आणि मुख्य म्हणजे या वयात यांना चक्क उपोषण परवडले का ?सईबाईंना पुढे करून कुणी राजकारण तर करत नाही ना ? असे प्रश्न नागरिकांना पडलेले दिसत आहे.सईबाई एकटीच कोरपना येथे कारेकरांच्या शेजारी राहते आणि या दोघात मैत्रीचे संबंध आहे हे मात्र विशेष. आता या प्रकरणात पुढे काय घडते हे पाहणे औचित्याचे ठरणार हे मात्र नक्की.
-------------//-----------
ते अतिक्रमणमध्ये येत आहे, प्रोसेस चालु आहे, आजुबाजुंच्या लोकांची तक्रार आली आहे,त्यांच्या स्वत:च्या नावाने जागा नाही, डाक्युमेंट तर मला मिळायला पाहिजेना, आता मी भुमिअभिलेख कडे देणार, मोजणी करणार त्यानंतर पैसे देणारच आहे पैसे थोडी थांबवणार.
कवीता गायकवाड
मुख्याधिकारी न.प.कोरपना
------------//---------
