प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- चंद्रपूर जिल्हा वनविभाग परिक्षेत्र अंतर्गत दिनांक 05ऑक्टोंबर 2021 रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व वन्यजीव सप्ताहाचे औचीत्य साधुन चिचपल्ली वनपरिक्षेत्रा तर्फे वन्यजीव संरक्षणार्थ जन जागृती रॅलीचे Public Awareness Rally for Wildlife Conservation आयोजन करण्यात आले.
सदर रैली ला सौ रत्नमाला भोयर नगराध्यक्ष मूल,व मा,श्री एन, आर,प्रवीण मुख्य वनसंरक्षक चन्द्रपुर यानी हिरवी झेंडी दाखवून रॅलीचे शुभारंभ केले सदर रैली मधे संजीवनी पर्यावरण संस्था मूल चे सदस्य नवभारत महाविद्यालय मूल येथील विद्यार्थी तसेच वनकर्मचारी व Pandit Deendayal Upadhyay Eco Park पंडीत दिनदयाल उपाध्याय ईको पार्क येथुन रॉलीची सुरवात करण्यात आली असून मा.सा. कन्नमवार सभागृहात रॅलीचे पदार्पन करुण एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख पाहुने व अतीथीचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रस्तावना चंद्रपुर वनविभागाचे सहायक वनसंरक्षक कु. निखिता चौरे मैडम यांनी केले असून कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन मा,श्री एन,आर,प्रवीण मुख्य वनसंरक्षक चंद्रपुर यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी उपस्थितांना योग्य मार्गदर्शन केले. आणि वन्यजीव संरक्षण यावर देखील सविस्तर माहिती दिली. तसेच अध्यक्ष भाषण मा, सौ,रत्नमाला भोयर नगरध्यक्ष मूल यानी करतांना वन्यप्राण्यांचे संरक्षणाबाबत वनविभागाची भूमिका काय असायला पाहिजे असे विचार व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कु,संध्या बगडे वनपाल यानी केले सदर कार्यक्रमात प्रमुख उपस्थिति श्री सतीश चोपड़े प्रशासकीय अधिकारी चंद्रपुर वनवृत्त ,श्री सिद्धांर्थ मेश्राम मुख्याधिकारी नगर परिषद मूल,डाँ. रविन्द्र होळी तहशीलदार मूल कु, प्रियंका वेलमे वनपरिक्षेञ अधिकारी चिचपल्ली ,श्री उमेशसिह झिरे अध्यक्ष संजीवनी पर्यावरण संस्था मूल व इतर सदस्य उपशित होते.
