चंद्रपूर - चंद्रपूर जिल्ह्यात वाढत्या घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सदर गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश दिले होते.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सदर गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष पथक तयार केले. Lcb chandrapur
पथकाने गुन्हे उघडकीस आणण्याच्या दिशेने तपास सुरू केला असता 1 ऑक्टोबर ला गुप्त माहिती पथकाला मिळाली की घुटकाला वार्ड निवासी 23 वर्षीय अप्सरा इलियास शेख ही सराफा लाईन मध्ये सोने विक्रीसाठी संशयास्पद स्थितीमध्ये फिरत आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाने अप्सराला ताब्यात घेत विचारपूस केली असता वरोरा येथील अभ्यंकर वार्ड येथील एका घरातून सोने-चांदीचे दागिने चोरी केली असल्याची कबुली दिली. Apsara
सदर गुन्ह्यात अप्सरा सोबत रहमतनगर वार्ड येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार फैजुल्ला खान हे दोघेही वरोरा येथे किरायाने रूम करून केली होती नंतर जवळच त्यांनी या घरफोडीचा गुन्हा केला.
महिलेकडून सोने-चांदीचे दागिने असा एकूण 97 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर घरफोडीचा गुन्हा वरोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल होता, अप्सरा ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फैजुल्ला खान याचा शोध सुरू आहे.
दुसऱ्या घरफोडीच्या गुन्ह्यात पोलीस स्टेशन रामनगर हद्दीत जानेवारी महिन्यात पागलबाबानगर येथील एका घरी घरफोडी झाली असल्याचा गुन्हा नोंद आहे, 3 ऑक्टोम्बरला गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगार फुकटनगर एकता चौक येथे राहणारा 22 वर्षीय गौतम उर्फ कोहली Kohli गणेश विश्वास याला ताब्यात घेतले. Burglary chandrapur
पोलिसांनी गौतम ची चौकशी केली असता त्याने जानेवारी महिन्यात पागल बाबा नगर येथे घरफोडी केली असल्याची कबुली दिली, आरोपी गौतम कडून चोरी गेलेले सोन्या चांदीचे दागिने एकूण किंमत 57 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे व अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वात सपोनि जितेंद्र बोबडे, पोउपनी संदीप कापडे, पोउपनी अतुल कावळे, संजय आतकुलवार, नितीन रायपुरे, गोपाळ आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, रवींद्र पंधरे व अपर्णा मानकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
