गडचांदूर :- उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी lakhimpur kheri येथे ८ निष्पाप शेतकऱ्यांना चिरडण्याची हृदयविदारक घटना घडली.संपूर्ण देशभरात या घटनेचे तिव्र पडसाद उमटले असून मोठ्याप्रमाणात ठिकठिकाणी निषेध व्यक्त होत आहे.याच पार्श्वभूमीवर सदर घटनेच्या निषेधार्थ ११ आक्टोंबर रोजी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी व घटक पक्षांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली.याच श्रेणीत गडचांदूर येथे सदर बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. सकाळ पासूनच काँग्रेस,राष्ट्रवादी कांग्रेस, शिवसेना व प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संयुक्तपणे शहरातील समस्त लहानमोठी दुकाने विनंतीपुरवक बंद केली. काही व्यापारी बांधवांनी स्वयफुर्तीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली तर काही ठिकाणी दुकानदार व कार्यकर्त्यांमध्ये तीव्रस्वरुपाच्या शाब्दिक बाचाबाचीचे प्रकारही घडले.पोलीसांच्या तत्परतेने मात्र उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आली. एकुणच शहरात काही अपवाद वगळता बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. Maharashtra band
mahavikas aghadi
बंदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशील कुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यजीत आमले यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे,सपोनि रायपूरे,एएसआय सुनील बोरीकर,वाहतूक पोलीस तीवारी, लाटकर,भटलाडे यांच्यासह बरेच महिला व पुरुष पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात होते.काँग्रेस,राकाँ,शिवसेना,प्रहार मित्र पक्षाचे नेते,पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सदर बंदच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.
