गोंडपीपरी/लाठी - दारू चा धंदा सुरू ठेवण्यासाठी आम्हाला महिना 18 हजार हवा, सदर पैसे हे आम्ही ठाणेदार साहेबांना देऊ, लाच मागण्याचा हा नवा प्रकार गोंडपीपरी तालुक्यातील लाठी गावात घडला.
चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक पोलिस निरीक्षक 38 वर्षीय मिलिंद पारडकर व पोलीस शिपाई 27 वर्षीय संजू रतनकर यांना 29 हजार 500 रुपये स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. Illegal liquer
फिर्यादी यांचा शेतीचा व्यवसाय असून ते दारूबंदी असताना अवैध दारूविक्री करीत होते, नंतर जिल्ह्याची दारूबंदी उठल्यावर त्यांनी पुन्हा शेतीच्या व्यवसायात लक्ष घालणे सुरू केले. Anti corruption trap
त्यानंतर पोलीस शिपाई संजू रतनकर फिर्यादीचा घरी वारंवार जात घरझडती घेत त्यांना त्रास देऊ लागले, तू पुन्हा दारूचा व्यवसाय सुरू केला आम्हाला महिन्याचे पैसे हवे यासाठी शिपायाने तगादा लावला.
दारूचा धंदा सुरू कर आम्ही कारवाई करणार नाही मात्र त्यासाठी ठाणेदार साहेबांसाठी दर महिना 36 हजार रुपयांची मागणी केली.
पोलिसांच्या मागणीवर फिर्यादीने आधी 6 हजार 500 रुपये दिले, उर्वरित रक्कम 29 हजार 500 रुपये लवकर द्या असा तगादा पोलिसांनी लावला मात्र फिर्यादीला पैसे देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिली. Chandrapur
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून 11 ऑक्टोम्बरला पोडसा येथे उर्वरित रक्कम स्वीकारताना सपोनि पारडकर व रतनकर यांना अटक करण्यात आली.
त्यावरून दोन्ही आरोपी यांचे विरुध्द पो.स्टे . लाठी, जि . चंद्रपूर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी राकेश ओला पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. नागपूर, मिलींद तोतरे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि., नागपुर, यांचे मार्गदर्शनात पोलीस उपअधिक्षक अविनाश भामरे, मनोहर एकोणकर, पोलीस नाईक अजय बागेसर, रोशन चाटेकर, नरेशकुमार ननावरे, संदेश वाघमारे, समीक्षा भोंगळे , चा.ना.पो.शि. सतीश सिडाम सर्व ला.प.वि., चंद्रपूर यांनी केली .
