चंद्रपूर - 25 सप्टेंबरला रामनगर पोलीस स्टेशनला फिर्यादी अभियंता 52 वर्षीय प्रदीप बाराहाते यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेकरिता लागणारे पाईप अज्ञात चोरट्यानी चोरून नेल्याची तक्रार दाखल केली होती. Maharashtra Jeevan Pradhikaran Yojana
म्हाडा कार्यालयाच्या समोरील खुल्या जागेत पाईपाचे थर लावले आहे, सदर पाईप हे प्राधिकरणाच्या कामाला लागणारे होते, यामध्ये 27 नग 100 मिमी चे पाईप किंमत 5 लाख 8 हजार 703, 15 नग 150 मिमी चे पाईप किंमत 88 हजार 971 रुपये असा एकूण 5 लाख 97 हजार 671 रुपयांचा माल चोरी गेला होता. Pipe theft
रामनगर पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, पोलिसांनी गुन्ह्यांचे घटनास्थळी भेट देत पाहणी केली, सायबर सेल cyber cell व रामनगर पोलिसांनी संयुक्त तपास सुरू केला, गुप्त माहितीच्या आधारे सपोनि हर्षल एकरे सह पोलीस कर्मचारी नांदेड येथे पोहचले.
नांदेड जिल्ह्यातील सैराबनगर येथील 40 वर्षीय शेख अजीस शेख मुस्तफा याला ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने पाईप चोरी केली असल्याची कबुली दिली व सदर चोरी केलेले पाईप 42 वर्षीय मोहम्मद शकील मोहम्मद शरीफ शेख व 32 वर्षीय शेख अक्रम शेख अनवर रा.औरंगाबाद यांना विकले असल्याचे सांगितले.
रामनगर पोलिसांनी चोरी गेलेले पाईप जप्त करीत एकूण 9 लाख 7 हजार 765 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक करीत रामनगर पोलीस स्टेशनमध्ये आणले.
चोरीच्या गुन्ह्याचा तपास चंद्रपूर वरून थेट नांदेड जिल्ह्यातुन औरंगाबाद येथे पोहचला सदर आरोपीवर कारवाई करीत चोरीचा गुन्हा उघडकीस केल्याने एकरे यांचं अभिनंदन करण्यात येत आहे.
सदरील गुन्हा यशस्वीपणे उघडकीस आणण्याची कारवाई पोलीस अधिक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधिक्षक अतुलचंद्र कुलकर्णी, उपविभागिय पोलीस अधिकारी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोनि मधुकर गिते , सपोनि हर्षल एकरे, पोउपनि भुरले, पो हवा रजनीकांत पुठ्ठावार, प्रशांत शेंदरे, विनोद नापोशि / पुरूषोत्तम चिकाटे, किशारे वैरागडे, पेतरस सिडाम, संजय चौधरी, विनोद यादव, पांडुरंग वाघमोडे, निलेश मुडे, सतिश अवथरे, लालु यादव, विकास जुमनाके, संदिप कामडी, माजीद पठान, हिरालाल गुप्ता, मनापोशि भावना रामटेके यांनी केली आहे.