गडचांदूर :- चंद्रपूर जिल्हा दारूबंदी असताना मागेल तेवढी आणि पाहिजे तेवढी देशी, विदेशी दारू अक्षरशः घरपोच मिळत होती. त्या काळात लहान मुले, तरूण, वृद्धांनासह महिला सुद्धा या व्यवसायात गुंतल्याचे चित्र पहायला मिळाले. दारूबंदीच्या अंमलबजावणीसाठी कित्येक कर्तव्यदक्ष पोलीसांनी आपल्या प्राणांची आहुती दिली तर काहींनी या संधीचे सोने केले.असे असताना आता जिल्हा दारूबंदी मुक्त District alcohol free झाला आहे. तरीपण काही ठिकाणी आजही अवैध दारूविक्री होत असल्याचे दिसून येत आहे.याचे जिवंत उदाहरण म्हणजे कोरपना शहरात ठिकठिकाणी खुलेआम अवैधरीत्या देशी दारूची विक्री सुरू आहे.या दारू विक्रेत्यांवर कारवाई करून अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी कोरपना पंचायत समितीचे माजी सभापती तथा सदस्य श्याम रणदिवे यांनी थेट दारू विक्रेत्यांची नावे व विक्रीच्या ठिकाणांसह कोरपना ठाणेदाराकडे निवेदनाद्वारे केली आहे.यापुर्वी १८ आगस्ट २०२१ रोजी सुद्धा रणदिवे यांनी लेखी तक्रार केली होती मात्र आजपर्यंत याविषयी सकारात्मक काहीच घडले नाही हे मात्र विशेष. illegal sale of liquor continued
श्याम रणदिवे यांनी दिलेल्या निवेदनानुसार सविस्तर असे की,कोरपना शहरात देशी दारूची अवैध विक्री खुलेआम सुरू आहे.गडचांदूर-कोरपना रोड व साई होंडा शोरूम समोर गोविंद मोरे.राज इंग्लिश शाळेच्या बाजूला,बजाज शोरूमच्या मागे लखनसिंह ठाकुर, आठवडी बाजार,चिकन मार्केट जवळ शिवा उर्फ सुधाकर मुठ्ठावार, इंदिरानगर, झोपडपट्टी पंचायत समितीच्या बाजूला माधव मोहितकर आणि येथील एका सेवानिवृत्त कर्मचार्याच्या घराजवळ संतोष हे व्यक्ती येथे अवैधरीत्या दारूविक्री करीत आहे. तसेच नारंडा येथील दालमिया(मुरली) सिमेंट Dalmia cement कंपनी जवळील आरीफ़ नामक व्यक्ती चंद्रपूर जिल्हा लगतच्या जिल्ह्यातून बनावटी देशी,विदेशी दारूचा पुरवठा करीत आहे. या सर्वा लोकांवर कायदेशीर कारवाई करावी व सुरू असलेली अवैध दारूविक्री बंद करावी अशी मागणी रणदिवे यांनी पुन्हा कोरपना ठाणेदाराकडे केली आहे. जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर,अतिरिक्त पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अधिक्षक दारूबंदी चंद्रपूर, उपविभागीय पोलीस अधिकारी गडचांदूर, निरिक्षक दारूबंदी उत्पादक शुल्क राजूरा यांनाही पुर्वी दिलेल्या निवेदनाच्या प्रत सह रणदिवे यांनी निवेदन दिले आहे. पहिल्या तक्रारीला केराची टोपली दाखवली मात्र आता पुन्हा रणदिवे यांनी दिलेल्या तक्रारीवर ठाणेदार कारवाई करून अवैध दारूविक्रीवर अंकुश लावतील का ? याकडे लक्ष लागले आहे.