चंद्रपूर - मागील काही दिवसापासुन चंद्रपुर शहरात रात्रो घरफोडी होणे नित्याची बाबत झाली आहे अशा गुन्हयांना आळा घालण्याकरिता पोलीस अधिक्षक चंद्रपुर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते या निर्देशानुसार पोलीस निरिक्षक बाळासाहेब खाडे स्थागुशा चंद्रपुर यांनी एक विशेष पथक नेमुन त्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी अनेक दिवसापासुन सापळा रचला. दि . 09/10/21 रोजी दुपारी 10/00 ते 11/00 वा . सुमारास गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की पोस्टे रामनगर रेकॉर्डवरील घरफोडीचा वि.स.बा. फुकटनगर बॉम्बे प्लॉट चंद्रपुर येथे राहणारा एका काळया रंगाचे बॅगमध्ये बिना कागदपत्राचे लॅपटॉप विकण्यासाठी गि - हाईक शोधत आंनद नगर माहाकाली कॉलरी वॉर्ड चंद्रपुर येथे संशयास्पद स्थितीत फिरत आहे, juvenile accused
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर ईसमास ताब्यात घेवुन बॅगची झडती घेतली असता त्याचे काळया रांगाचे बॅगमध्ये एक डेल कंपनीचा लॅपटॅप, लॅपटॅप चार्जर, 2 नग माउस, एक काळ्या रंगाचा सॅमसंग कपंनीचा मोबाईल, एक पांढऱ्या रंगाचा सोनी कंपनीचा मोबाईल बंद असलेला, एक बोट Bot कपंनीचा हेडफोन Headphone असा एकुण 27,200 / - रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला. वरिल नमुद विसबा यास सदर लॅपटॉप Laptop, मोबाईल कोठुन आणले याबाबत पंचासमक्ष सविस्तर विश्वासात घेवुन विचारपुस केली असता अंदाजन पाच दिवसाअगोदर आनंदनगर महाकाली कॉलरी वॉर्ड चंद्रपुर येथे दोघांनी मिळुन रात्रोला बाबुपेठ परिसरातील एक बंद असलेले घराचा ताला तोडुन घरातुन लॅपटॉप व मोबाईल चोरी केल्याचे सांगितले. Lcb chandrapur
दोन्ही अल्पवयीन आरोपीने पोस्टे चंद्रपुर शहर अप कं अप . कं 778 / 21 कलम 454, 457, 380 भादवीचा गुन्हा केल्याचे निष्पण्ण झाले. या गुन्हया व्यतीरिक्त जयश्रिया बियर शॉपी Beer shoppe येथे चोरी केली असल्याचे सांगितल्याने खालील प्रमाणे मुददेमाल पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला. हायवर्ड Haywards 5000 कंपनीची बियर , DAJHUA कंपनीची DVR मशीन , HDCRYSTAL कंपनीचा अॅडप्टर , एक अॅडप्टर , एक DAJHUA कंपनीचा CCTV HD कॅमेरा असा एकुण 11,000 / - रू चा मुददेमाल मिळुन आला वरिल मुददेमाल पोस्टे चंद्रपुर शहर अप . कं 788 / 21 कलम 457, 380 भादवी मधील आहे. तसेच बाबुपेठ परिसरातील महादेव मंदीराजवळील बंद घराचा लॉक तोडुन चोरी केल्याचे सांगितल्या प्रमाणे मुद्देमाल पंचासमक्ष हस्तगत करण्यात आला. पाच नग सोन्याचे जिवती वजन अं . 1.720 ग्रॅम, एक नग सोन्याची नथ वजन अं. 0.850 ग्रॅम, दोन नग सोन्याची कानातील बारी वजन अं . 0.840 ग्रॅम, चार नग चांदीचे लहान मुलांचे हातातले कळे वजन अं . 10.420 ग्रॅम , एक नग चांदीची चैन वजन अं . 4,820 ग्रॅम असा एकुण 19,500 / - रू चा मुददेमाल मिळुन आला वरिल मुददेमाल पोस्टे चंद्रपुर शहर अप . कं 786 / 21 कलम 457, 380 भादवी मधील आहे. सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधिक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे पोलीस उप निरीक्षक संदिप कापडे, संजय आतकुलवार, पो.कॉ. नितीन रायपुरे , गोपाल आतकुलवार, कुंदनसिंग बावरी, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, म.पो.शि. अपर्णा मानकर यांनी केली.