चंद्रपूर - लखीमपूर खिरी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या नरसंहार विरोधात राज्यात महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंद ची हाक 11 ऑक्टोम्बरला पुकारली, त्यानुसार प्रशासनाने काही अनुचित घटना घडू नये यासाठी सुरक्षेची पूर्व तयारी सुरू केली.
कुठेही जाळपोळ च्या घटना घडू नये यासाठी शहर पोलीस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल दिलीप कुरजेकर यांनी पालिकेच्या अग्निशमन विभागातील अधिकारी चैतन्य चवरे यांना अग्निशमन विभागाच्या गाडीची मागणी केली असता त्यांनी "तुम्ही कोण बोलत आहात" अशी विचारणा केली त्यावर कुरजेकर यांनी आपला परिचय हेड कॉन्स्टेबल शहर पोलीस ठाणे असा दिला, त्यावरही अभियंता चवरे यांनी मी कॉन्स्टेबल यांच्याशी बोलणार नाही तुम्ही तुमच्या DYSP पदाच्या अधिकाऱ्यांना माझ्याशी बोलायला सांगा असे उत्तर दिले. Fire brigade cmc chandrapur
लेखी पत्र दिल्याशिवाय तुमच्या मागणीची पूर्तता होणार नाही असेही यावेळी सांगितले असता कुरजेकर यांनी रविवारचा दिवस सुट्टीचा असल्याने पत्र आपल्यापर्यंत सोमवारी सकाळी पाठवून देऊ असे सांगितले मात्र अभियंता हे काहीच ऐकण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हते.
शेवटी कुरजेकर यांनी पुढील बोलणे करण्यासाठी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांना अभियंता चवरे यांच्याशी बोलणे करायला लावले.
मात्र चवरे यांच्या बोलण्याची पद्धत बदलली नाही, पोलीस निरीक्षक आंभोरे सिनियर असून त्यांच्यासोबतही जेव्हा अभियंता असे बोलणे करू शकतो तर सामान्य माणसासोबत ते कसे बोलत असणार याचा प्रत्यय पोलीस विभागाला आला.
शेवटी यासंबंधी पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याशी उद्धट बोलल्याने पोलीस निरीक्षक आंभोरे यांनी चवरे यांच्या नावाची नोंद पोलीस डायरीत करायला लावत मनपा आयुक्त मोहिते व पालिवाल यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. Arrogance
डायरीत झालेली चवरे यांच्या नावाची नोंद व अहवाल पोलीस विभाग महानगरपालिका आयुक्तांना पाठविणार असून यावर पालिका आयुक्त काय कारवाई करेल यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
मात्र पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्याशी उद्धटपणा त्या अधिकाऱ्याला भोवणार हे मात्र विशेष.
आंदोलन होण्यापूर्वी पोलीस विभागाने दक्षता म्हणून संबंधित विभाग प्रमुखांना त्याबद्दल सूचना दिल्या मात्र अश्या उद्धट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यामुळे पोलीस विभागाला सुद्धा काही वेळ दमछाक करावी लागली.