प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल- महाराष्ट्र शासनाने पीक पाहणी करण्याचा उपक्रम सुरु केला असून शेतकऱ्यांसाठी ई -पीक आप नोंदणी करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत देण्यात आली होती.परंतु अजूनही ग्रामीण भागात मोबाइल नेटवर्किंग Mobile Network बरोबर राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असंख्य शेतकरी बांधवांकडे स्मार्ट smart मोबाइल तर सोडा साधा सुद्धा नाही. अशी अवस्था शेतकरी बांधवांची आहे. आणि ग्रामीण भागात ऑनलाइन online अनेक सर्व्हर डाऊन server down राहत असल्यामुळे काही शेतकरी बांधवांनी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पीक नोंदणी केल्यानंतर अपलोड होत नाही. आणि सर्व्हेनंबरही चुकीचा दाखविल्या जात असल्याच्या अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांची पीक नोंदणी शासनाने दिलेल्या मुदतीत होऊ शकली नाही. नोंदणी करण्यासाठी शेतकऱ्यांना असंख्य अडचणी उद्भभवताहेत तसेच शासकीय आधारभूत धान विक्रीची मुदत देखील ३० सप्टेंबर २०२१ पर्यंतच शासनाने दिलेली होती. परंतु २०२१-२०२२ च्या पिकपेऱ्याची नोंदणीच अजूनपर्यंत नेटवर्किंगच्या अनागोंदी कारभारामुळे अद्यावत होऊ शकली नाही करिता आधारभूत धान विक्री करण्यापासून अनेक शेतकरी वंचित राहत असून शेतकऱ्यांचे खूप नुकसान होणार आहेत. एकीकडे सततच्या नापिकीमुळे आणि अति पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकावर कडा-करपा आणि पिवळ्या पानोरीचा रोग सर्वत्र तालुक्यात लागला असल्यामुळे शेतकरी पहिलेच चिंतेत सापडला असतांना परत शेतकऱ्यांवर ई-पीक पेऱ्याची नोंद करणे आणि शासनाच्या नियमानुसार आधारभूत धान विक्री मुदतीत करणे शेतकऱ्यांना शक्यच होणार नाही. यासाठी आधारभूत धान विक्री करिता नोंदणी करण्याची मुदत ३१ आक्टोंबर २०२१ पर्यंत वाढवून द्यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी जी. प.अध्यक्ष संतोषसिंह रावत यांच्या मार्गदर्शनाखाली मुल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती घनश्याम येनुरकर यांनी महाविकास आघाडी शासनाचे मुख्यमंत्री नाम.उद्धवजी ठाकरे यांचेकडे एका लेखी पत्राद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी केली आहे. निवेदनाच्या प्रति शासनाचे महसूल मंत्री,नाम.बाळासाहेब थोरात,मदत व पुनर्वसन,ओबीसी तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.विजय वडेट्टीवार व मान. जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर, उपविभागीय अधिकारीव साहेब मुल यांच्याकडेही देऊन विनंती केली आहे.
