चंद्रपूर- दिनांक 30 सप्टेंबर 2021 ला जिल्हा परिषद प्राथ. शाळा पायली येथे मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी वित्त आणि नियोजन व वन मंत्री तथा माजी पालकमंत्री ex-gurdian minister जिल्हा चंद्रपूर यांचे स्थानिक विकास कार्यक्रम निधी अंतर्गत शाळेला वॉटर कूलर water cooler तथा प्युरीफायर भेट देण्यात आले. या भेटवस्तूचे उद्घाटन मा. रोषणीताई अन्वर खान महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचे हस्ते पार पडले. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मा. मा.रामपालजी सिंह, मनपा सदस्य, मा. संजयजी यादव, पंचायत समिती सदस्य, चंद्रपूर, मा. अनिता भोयर, तालुका अध्यक्ष, महिला आघाडी भा. ज. पा., मा. राकेश गौरकार, सरपंच ग्रामपंचायत पायली भटाळी, मा. नदीम रायपुरे, सदस्य ग्रामपंचायत पायली भटाळी, मा. राजकुमार रायपुरे, माजी उपसरपंच ग्रामपंचायत पायली भटाळी, मा. बाबूराव मडावी, गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती, चंद्रपूर, मा. वंदेश फुलझेले, केंद्रप्रमुख केंद्र - पद्मापूर, श्री निखील तांबोळी, मुख्याध्यापक जि. प. शाळा, पायली तसेच शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक हे उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक तथा ग्रामस्थांनी शाळेला वॉटर कूलर तथा प्युरीफायर दिल्या बद्दल आभार व्यक्त केले. Sudhir mungantiwar
