चंद्रपूर - 3 ते 4 दिवसांपूर्वी जुनोना जंगलात बाबूपेठ येथे 3 ते 4 नागरिक सरपण आणण्याकरिता गेले होते, त्याचवेळी जुनोना वनविभागातील कर्मचाऱ्यांनी 4 जणांना गाठले त्यातील दोघे पळून गेले मात्र दोघांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली.
सदर मारहाण ही अमानुषतेचा कळस गाठणारी होती.
यामध्ये बाबूपेठ येथील 45 वर्षीय सुरेंद्र देवाडकर यांना मारहाणीत त्यांच्या शरीरावर वेगळ्या पद्धतीच्या खुणा उमटल्या, देवाडकर हे 2 दिवस घरी गेलेच नाही, बुधवारी जेव्हा ते आपल्या घरी पोहचले त्यावेळी त्यांना मारहाण करण्यात आल्याचे कुटुंबाला कळले.
त्यांना रुग्णालयात सुद्धा दाखल करण्यात आले होते मात्र त्यांना होणारा असह्य त्रास कमी होत नव्हता अखेर 1 ऑक्टोबर ला पहाटेच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. Chandrapur forest department
जंगलात सरपण आणण्यासाठी गेलेल्या विलास मुत्तावर, अनिता मुत्तावर, किशोर ठाकूर व सुरेंद्र देवाडकर गेले होते.
यामधील प्रत्यक्षदर्शीनी वनरक्षक forest ranger बालाजी राठोड यांनी सुरेंद्रला मारहाण केली असल्याचे सांगितले.
बाबूपेठ येथील नगरसेवक अनिल रामटेके यांनी देवाडकर कुटुंबाला न्याय मिळावा व वनरक्षक राठोड यांचेवर कठोर कारवाई व्हावी यासाठी रामनगर पोलीस ठाण्यात मृतदेह ठेवून आंदोलन सुरू केले.
जर पोलिसांनी कायदेशीर कारवाई न केल्यास बहुजन समाज पक्षाच्या वतीने प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण आंदोलन करण्यासाठी मी मागेपुढे बघणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी दिला.
