प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असलेल्या नांदगाव येथील होतकरु कर्तव्यदक्ष युवती सरपंच ऍड. हिमानी दशरथ वाकुडकर यांच्या पुढाकारातून राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री lal bahadur shastri जयंती दिनाचे औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धेचे Essay Competition आयोजन करण्यात आले. यात कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर प्रथम क्रमांक ११ वी कु. छकुली अनिल मशाखेत्री द्वितीय कु.कोमल रामदास काटवले, तर हायस्कुल स्तरावर प्रथम क्रमांक जिल्हा परिषद हायस्कुल, दुधे व द्वितीय क्रमांक तोहगावकर यांनी मिळविला स्पर्धा आयोजनासाठी सरपंच ऍड. हिमानी वाकुडकर, मुख्याध्यापक श्री.बोरीकर, दांडेकर सर, मुरकुटे मॅडम जनसेवा महाविद्यालय नांदगाव, तलाठी मेश्राम, ग्रामपंचायत सदश, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक,मदतनीस, यांनी सहकार्य केले. निबंध स्पर्धेचे परीक्षक श्री. पाल सर, बक्षी सर, यांनी केले. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक हिताच्या दृष्टीने आयोजित केलेल्या या नावीन्य उपक्रमाबद्दल सरपंच ऍड. हिमानी वाकुडकर यांचे नांदगाव वाशीय जनतेकडून कौतुक केले जात आहे.
