चंद्रपूर/दुर्गापूर - शक्तीनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 5 ते 7 ऑक्टोबर दरम्यान चोरीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.
चोरांनी आता शिक्षणाच्या मंदिराला सुद्धा सोडले नाही, कोरोनामुळे मागील वर्षीपासून शाळा बंद होती.
या गोष्टीचा फायदा घेत चोरांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील तब्बल 30 हजार रुपयांचे कम्प्युटर 2 मॉनिटर, 8 हजार रुपयांचा ZENITH कंपनीचा CPU, एक LED मॉनिटर कि. 20000/रु., एक विज्ञान पेटी कि. 2000/रु., दोन माईक व अँम्लीफायर कि. 7000/रु., दोन वाजवायचे ड्रम कि. 3000/रु. असा एकूण 70000/रु.चा माल चोरांनी लंपास केला.
दुर्गापुर पोलीस स्टेशनला यासंबंधी तक्रार दाखल होताच स्थानिक गुन्हे शोध पथकाचे पोउपनी प्रवीण सोनुने यांनी चौकशी सुरू केली असता या प्रकरणी 2 आरोपींना पोलिसांनी अटक करीत विचारपूस केली, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चोरी केली असल्याची त्यांनी कबुली दिली. Theft at Zilla Parishad Primary School
आरोपी शाम सुरेश पवार वय 24 वर्षे रा. दुर्गापूर वार्ड क्र 4 याला अटक करण्यात आली असून श्याम चा साथीदार संदीप राजू धोत्रे रा.दुर्गापूर वार्ड पसार झाला आहे. पोलिसांनी आरोपी श्याम कडून दोन मॉनीटर झेनीत कंपनीचे कि.अं 30, 000/रू., एक CPU झेनीत कंपनीचा कि. 8000 /रु., एक विज्ञान पेटी कि. 2000/रु., दोन वाजवायचे ड्रम कि. 3000/रु.
असा एकूण 43,000/रु.चा माल जप्त करण्यात आला.
सदरची यशस्वी कारवाई दुर्गापूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनात डी.बी पथकाचे पोउपनी प्रविण सोनोने, पोहवा सुनिल गौरकार, पोशि मंगेश शेंडे, पोशि मनोहर जाधव, पोशि. किशोर वलके यांनी पार पाडली.
