बल्लारपुर ( रमेश निषाद)
👉सद्यस्थितीत बल्लारपूर शहरात सण उत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर आली की काय अशी स्थिती आहे. मागील काही दिवसांपूर्वी बल्लारपूर शहरात दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर शहरात 8 ऑक्टोम्बरला सायंकाळी ६:०० वाजताच्या सुमारास पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास ३५ पोलीस कर्मचाऱ्याच्या ५ टीम या नगर परिषद चौक, गोल पूल, नवीन बसस्थानक, कादरीया मस्जिद चौक व बालाजी कॉम्प्लेक्स परिसरात जाऊन नाकाबंदी करून दुचाकी चालकांच्या वाहन परवाना तपासणी मोहीम सुरू केली. Ballarpur Police On Duty
विशेष म्हणजे गोल पूल परिसरात १२ ते १३ तर इतर ठिकाणी ५ ते ६ पोलीस कर्मचारी उपस्थित होते ज्या वाहन धारकाकडे वैध कागदपत्रे नसेल त्यांचेकडून दंड वसूल केला जात असल्याची माहिती पोलीस स्टेशन बल्लारशाह कडून प्राप्त झाली आहे.बल्लारपूर पोलीस ऍक्टिव्ह मोडवर Active Mode आली की काय अशी माहिती आहे, विना लायसन्स दुचाकी चालविणाऱ्या कडून दंड वसूल केला जात आहे.