चंद्रपूर - धन्नू महाराज यांनी नगराध्यक्ष असतांना आपल्या शिस्तीने प्रशासनावर अंकुश ठेवत चंद्रपूरात अनेक असाधारण गोष्टी सहज शक्य करून दाखविल्यात त्यांच्याच कार्यकाळात चंद्रपुरची प्रमुख ओळख असलेली सात मंजली इमारत Seven storey building in chandrapur उभी राहिली. आज त्यांच्या जाण्याने चंद्रपूरकरांनी एक शिस्तप्रिय आणि प्रभावशाली व्यक्तिमत्त्व कायमच गमावलं असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी धन्नू महाराज त्रिवेदी यांच्या निधनानंतर दिलेल्या शोकसंदेशात मटले आहे. Dhannu maharaj
धन्नू महाराज हे यशस्वी राजकारण्यासह उत्तम व्यवसायिकही होते. त्यांचे अनेक राजकीय पक्षातील लोकांशी चांगले संबध होते. आमदार झाल्यानंतर चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांनी मला अनेकदा अनेक सूचना केल्यात त्यातून चंद्रपूरच्या विकासासाठी त्यांची असलेली तळमळ जणवायची. मी नुकतीच त्यांची भेट घेतली होती. ते नगराध्यक्ष असतांना मनपा प्रशासनावर त्यांची उत्तम पकड होती. त्यांच्या कार्यकाळात झालेली कामे दर्जेदार असायची. आज त्यांच्या जाण्याने राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याचे आ. जोरगेवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
