गडचांदूर :- गडचांदूर येथे करोडोंच्या खर्चाने ग्रामीण रुग्णालयाची इमारत नव्याने बांधण्यात आली.मात्र ही इमारत विविध समस्यांच्या विळख्यात सापडली असून दहा दिवसाच्या आत समस्या मार्गी लावण्यात यावी यासाठी कोरपना तालुका बहुजन आघाडी आक्रमक झाल्याचे चित्र असून ग्रामीण रुग्णालय rural hospital इमारतीत घाणीचे साम्राज्य पसरले आहे, याठिकाणी कुठल्याही प्रकारची स्वच्छता नाही. इमारतीच्या प्रवेशद्वारा पासून तर संपूर्ण इमारतीत पाणी गळती होत असल्याने औषध साठा खराब होत आहे.याठिकाणी सुविधा आपुऱ्या आहे.ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा प्राप्त असूनही परिपूर्ण स्टाफ नाही. सर्वसामान्यांचा इलाज व्यवस्थित होत नाही चंद्रपूरला रेफर करण्यात येते.इमारत बाधून जास्त वर्षे झाली नाही मात्र इमारत जीर्ण अवस्थेत आहे.इमारत बांधणाऱ्या कंपनीवर गुन्हा दाखल करावा.३० सप्टेंबर रोजी रुग्णवाहिका ambulance accident अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना जास्तीत जास्त आर्थिक मदत द्यावी. रुग्णवाहिका ठेकेदार, मालक आणि चालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून येत्या दहा दिवसाच्या आत संपूर्ण मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन उभारण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडी Vanchit Bahujan Aghadi तालुकाध्यक्ष मधुकर चुनारकर यांनी गडचांदूर वैद्यकीय अधिकार्यांमार्फत पाठवलेल्या निवेदनातून चंद्रपूर जिल्हा वैद्यकीय अधिकार्यांना दिला आहे.निवेदन देताना वंचित बहुजन आघाडीचे इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
