चंद्रपूर - 7 ऑक्टोम्बरपासून नवरात्रीला प्रारंभ झाला असून अनेक भक्त महाकाली मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत आहे मात्र काही गुन्हेगार या संधीचा फायदा घेत आहे. City police chandrapur
9 ऑक्टोम्बरला चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये गडचिरोली जिल्ह्यात राहणारे फिर्यादी नरेश खेडकर हे महाकाली मंदिर Mahakali Mandir परिसरात दर्शनासाठी आले असता रात्री 3 वाजता अज्ञात 3 युवक त्यांच्याजवळ आले व फिर्यादी यांचा मोबाईल व 500 रुपये रोख जबरीने चोरून नेले. Theft
तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील फिर्यादी हा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी आला असता कुणीतरी त्याची दुचाकी वाहन two Wheeler चोरी केल्याची फिर्याद शहर पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली.
दोन्ही गुन्ह्यांची गंभीर दखल घेत शहर पोलिसांनी तपास सुरू केला. Robbed
जबरी चोरी प्रकरणी शहर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला, यामध्ये आरोपी दर्शन अशोक तेलंग वय २२ वर्ष, राहुल झंझोटे वय २३ वर्ष, कमलेश वर्मा वय १ ९ वर्ष तिन्ही रा बल्लारशा यांच्या जवळून एक नोकीया कंपणीचा मोबाईल mobile कि अं ५००० / रू, ३ नग मोबाईल हॅन्डसेट कि अं . 30000 / - रू ३ ) एक मोपेड गाडी कि.अं. ८०००० / -रू असा एकूण १,१५,२२० / - रु चा माल जप्त करण्यात आला.
दुसऱ्या दुचाकी वाहन चोरी या गुन्ह्यासंदर्भात शामनगर चंद्रपूर येथील 23 वर्षीय अतुल विकास राणा याला ताब्यात घेत विचारपूस करण्यात आली, सदरील चोरी झालेली दुचाकी अंदाजित किंमत 10 हजार रुपये जप्त करण्यात आली.
सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी शिलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर आंभोरे यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पो.उप. नि निलेश वाघमारे, विजय कोरडे, दौलत चालखुरे, शरिफ शेख, विलास निकोडे, महेंद्र बेसरकर, जयंता चुनारकर, रामकिसन सानप, सचिन बोरकर, सतिश टोंगलकर, इमरान शेख, पोशि रूपेश रणदिवे, वेतन गज्जलवार, प्रमोद डोंगरे, संतोश भिया, संजिवनी, रिजा राडे यांनी केली आहे.