चंद्रपूर - शाळेच्या पहिल्याच दिवशी आदर्श शिक्षकाचे अश्लील कार्य उघडकीस आल्याने शैक्षणिक क्षेत्रात चांगलिच खळबळ उडाली होती.
बल्लारपूर तालुक्यातील केम तुकूम या गावी जिल्हा परिषद शाळेतील आदर्श शिक्षक मुख्याध्यापक भाऊराव तुमडे यांच्या शाळेतील 5 व्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने अश्लील चाळे केल्याचा आरोप लावला होता, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत मुख्याध्यापकाला अटक केली मात्र त्यांनतर तब्बल 7 मुलींनी तसाच प्रकार आपल्यासोबत घडल्याची तक्रार बल्लारपूर पोलीस स्टेशनला दाखल केली. Sexual Harassment
राजुऱ्यातील इन्फन्ट जेसीस शाळेनंतर जिल्ह्यातील हा दुसरा प्रकार उघडकीस आल्याने पालकांनी सुद्धा आता आपल्या मुलाबाळांची चिंता सतावू लागली आहे.
केम तुकूम प्रकरणी भाजपच्या आदिवासी आघाडीने सदर प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेत हे प्रकरण जलदगती न्यायालयात fast track Court चालविण्याची मागणी करीत त्या मुख्याध्यापकाला दिलेला आदर्श शिक्षक ideal teacher पुरस्कार शासनाने परत घ्यावा अशी मागणी पत्रकार परिषदेत केली. Bjp chandrapur
चंद्रपूर भाजप जिल्हा महानगर आदिवासी आघाडीचे अध्यक्ष धनराज कोवे यांनी प्रशासनाला 7 दिवसाचा अल्टीमेटम दिला असून अश्या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यास विलंब होत असल्याचा आरोपही कोवे यांनी प्रशासनावर लावला आहे.
अल्पवयीन मुलींवर आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळेत असे प्रकार घडू नये यासाठी जिल्हा स्तरावर प्रशासनाने समिती नेमावी व प्रत्येक शाळेत भेट देत मुलींचे मनोबल व समुपदेशन करण्याचे काम त्या समितीने करायला हवे.
त्यामुळे अल्पवयीन मुलींवर होत असलेले अन्याय अत्याचार उघडकीस येईल यावर प्रशासनाने तात्काळ निर्णय घेत दखल घ्यावी अन्यथा भाजप अनुसूचित जमाती मोर्चा यावर उग्र आंदोलन करण्यास मागे पुढे बघणार नाही असा इशारा धनराज कोवे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी जिल्हाध्यक्ष हरीश गेडाम, यशवंत सिडाम, किशोर मेश्राम, अरविंद मडावी व पीडित मुलींचे कुटुंब उपस्थित होते.