गडचांदूर :- केंद्र असो की राज्य सर्व ठिकाणी एखाद्या लोकप्रतिनिंधी जर विकासाच्या दृष्टीने एखादे काम मंजूर करून दिले की, त्याचे मोठमोठे पोस्टर बॅनर लावणे, व्हाट्सअप Whatsapp,फेसबुक Facebook, वृत्तपत्र Newspaper, टिव्हीद्वारे प्रसिद्धी करणे,मोठ्या थाटामाटात उदघाटन,भूमिपूजन लोकार्पण सोहळे साजरे करणे,जेणेकरून विकास कामांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी हा यामागचा उद्देश असतो.ही राजकारण्यांची सवय असून या पार्श्वभूमीवर गडचांदूर येथे नगरपरिषदेकडून शहरात सुरू असलेल्या कामांचे भूमिपूजन,उदघाटन झाले. उदाहरणार्थ येथील मुख्य मार्गावरील डिवायडरवर लावण्यात आलेले स्ट्रीट लाईट,साधा वॉटर एटीएम व इतर काही विकासात्मक कामांचे उदघाटन नगराध्यक्षांच्या शुभहस्ते मोठ्या धुमधडाक्यात पार पडले. फोटोसेशन करून सोशल मीडियावर Social Media धुमाकूळ माजविला. ऐवढेच नाही तर मोठमोठे पोस्टर,बॅनर लावून आमदारांना बोलावून कित्येक उदघाटन,लोकार्पण सोहळे साजरे करण्यात आले.असे असताना मात्र शहरातील विविध प्रभागात अंदाजे ११ ते १२ ठिकाणी लाखोंचे अत्यंत महागडे ओपन ग्रिनजिम लावण्यात आले.काही ठिकाणचा तर विरोधी नगरसेवकांना याचा सुगावाही लागला नाही. उदघाटन सुद्धा कुणाच्याही शुभहस्ते झाले नाही.आता याला सत्ताधाऱ्यांचा मोठेपणा म्हणावा की विरोधी नगरसेवकांनी यासंदर्भात केलेली कमाल,हे कळायला मार्गच उरला नाही.
यासंदर्भात असे की,गडचांदूर शहरातील विविध प्रभागांमधील ओपनस्पेसवर प्रथमतः ओपन ग्रिनजिमचे साहित्य लावण्यात आले.याविषयी विविधप्रकारे नागरिकांच्या तक्रारीवरून सत्यता पडताळणीसाठी न.प.च्या विरोधी नगरसेवकांनी त्या त्या प्रभागातील नागरिकांच्या उपस्थितीत संपूर्ण ग्रिनजिमचा स्पॉट पंचनामा केला.तेव्हां यांना त्यात अनेक तृट्या आढळून आल्या. यातील मुख्य बाब म्हणजे ग्रिनजिमचे साहित्य पाहून त्याच्या दरांबद्दल शंका निर्माण झाली.खरे रूप जनतेपुढे यावे याउद्देशाने विरोधी नगरसेवकांनी चक्क प्रत्येक ग्रिनजिमच्या साहित्यांवर दरांच्या चिठ्ठ्या व मोठमोठे बॅनर लाऊन "जरा जपून लई महागडा आहे" असे आवाहन केले. सध्या शहरात पाणी टाकी बांधकाम, ओपनस्पेसचे सौंदर्यकरण पाठोपाठ आता ग्रिनजिमच्या साहित्य दरांविषयी कमालीची चर्चा ऐकायला मिळत आहे. विरोधी नगरसेवकांनी लावलेल्या बॅनरवरून नागरिकांसह काही सत्ताधारी नगरसेवक सुद्धा दरांची वजाबाकी करण्यात मग्न दिसत आहे."अरे बापरे हे काय, कुठे नेवून ठेवाल गडचांदूर माझा" असे म्हणत नागरिक अक्षरशः डोक्यावर हात ठेवताना दिसून येत आहे. विरोधी नगरसेवकांच्या या कामगीरीमुळे ग्रिनजिम green gym बाबतीत खरे रूप जनतेसमोर आल्याने कदाचित याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते झालेले नसावे अशी उपहासात्मक चर्चा शहरात ठिकठिकाणी सुरू आहे.