गडचांदूर :- सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी हवालदिल झाला आहे.कापूस,सोयाबीन,तूर व इतर शेती पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे.झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मोबदला द्यावा अशी मागणी कोरपना तालुका शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. Shetkari Sanghatna
शेतकऱ्यांना सरसकट २५ हजार रूपये एकरी नुकसान भरपाई देण्यात यावी. इतर वन्य प्राण्यांप्रमाणे साप snake चावून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्यात यावी.ओला दुष्काळ Wet drought जाहीर करावा. अशी मागणी शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष अरूण नवले, जिल्हा उपाध्यक्ष निलकंठराव कोरांगे, युवा शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष श्रीनीवास मुसळे, तालुकाध्यक्ष बंडू राजूरकर,अविनाश मुसळे, रमाकांत मालेवर,सुभाष तुरानकर, प्रवीण एकरे इतरांनी तहसिलदार यांच्याकडे निवेनातून केली आहे.
