चंद्रपूर - चंद्रपुरचे माज़ी नगराध्यक्ष , ज्येष्ठ नेते गयाचरणजी त्रिवेदी यांच्या निधनाने चंद्रपुरच्या मातीशी समरस झालेला नेता आम्ही गमावल्याची शोकभावना माज़ी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे.
Dhannu Maharaj
चंद्रपुरचे नगराध्यक्ष म्हणून धुन्नू महाराज यांनी शहराच्या विकासात मोठे योगदान दिले आहे. विकासप्रक्रियेत त्यांनी कधीही राजकारण केले नाही. त्यांच्या निधनाने चंद्रपुरच्या राजकीय व सामाजिक क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे असेही आ. मुनगंटीवार यांनी शोकसन्देशात म्हटले आहे.
