प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था नागपूर विभागाच्या चंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळख असलेल्या सोमनाथ लगतच्या महारोगी सेवा समिती सोमनाथ प्रकल्प Maharogi Seva Samiti Somnath येथील लहान मुलांना फळं वाटप करुन तसेच सोमनाथ मंदिर परिसरात स्वच्छता अभियान Sanitation campaign राबवुन राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्तपणे जयंती साजरी करण्यात आली. प्रसंगी नागपूर विभाग उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे मॅडम, नागपूर विभाग सचिव रत्नाताई चौधरी मॅडम, चंद्रपूर जिल्हा सचिव सुषमा कुंठावार, जिल्हा संघटक श्रीरंग नागसे सर, गुरुदास चौधरी सर, कु. गौरी चौधरी ओम शेंडे,प्रकल्पातील पिजदुरकर सर,चाफेकर दांपत्य पुणे, सोमनाथ प्रकल्पातील विजय जुमडे ,याकर्लेवार यांचेसह अनेक कार्यकर्ते या अनेक लहान बालगोपाल उपस्थित होते. यादीनाचे औचित्य साधून महात्मा गांधी Mahatma Gandhi व लाल बहाद्दूर शास्त्री Lal Bahadur Shastri यांची ओळख आणि त्यांच्या कार्याविषयी गोष्टी मुलांना अवगत करून दिल्यात.