प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - शैक्षणिक सत्र २०२०-२१ साठी इयत्ता ६ वी च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ११/८/२०२१ च्या परीक्षेमध्ये सेंट अंणेन्स पब्लिक स्कुल St. Anne's Public School मुल येथे शिक्षण घेत असलेली कु. सृष्टी जगदीश हांडेकर हिची जवाहर नवोदय विद्यालय Jawahar Navodaya Vidyalaya तळोधी(बाळापूर) करिता निवड झाली. कु. सृष्टी हांडेकर ही प्राचार्य ते.क.कापगते यांची नात तर कर्मवीर महाविद्यालयातील प्रा.डाँ. उज्वला कापगते (हांडेकर) यांची मुलगी आहे. तिने नवोदय परीक्षेची पूर्व तयारी वैशाली देशमुख या शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण केली असून कु. सृष्टीच्या निवडीबद्दल सेंट अन्स पब्लिक स्कुल च्या प्रिन्सिपॉल डाली सिस्टर, आई-वडील,आजी आजोबा आणि सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले आहे.सिद्धार्थ जांभुलकरची नवोदयासाठी निवड
मुल - शैक्षणिक सत्र २०२१-२२ साठी इयत्ता ६ वि च्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या दिनांक ११/८/२०२१ च्या परीक्षेमध्ये सेंट अन्स हायस्कुल मुल येथे शिक्षण घेत असलेल्या सिद्धार्थ राजहंस जांभुलकर या विद्यार्थ्यांची जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बाळापूर) साठी जिल्हा यादीमध्ये 9 व्या क्रमांकावर निवड करण्यात आली. सिद्धार्थ च्या निवडीबद्दल विद्यालयाच्या प्राचार्य व सर्व शिक्षक वृंदानी अभिनंदन केले असून त्यांनी आई वडील,प्राध्यापक दीपक चुणारकर यांचे मार्गदर्शन लाभल्याचे सांगितले.