गडचांदूर :-धानोरा मार्गे चंद्रपूर शहराला जोडणारा कोरपना तालुक्याच्या सीमाभागातील भोयगाव, भारोसा वर्धा नदीच्या पुलावर मोठमोठे खड्डे Huge pits पडल्याने वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघाताची Accident शक्यता बळावली असून संबंधीत विभागाने याकडे त्वरित लक्ष देऊन आठ दिसाच्या आत या खड्ड्यांची दुरूस्ती करावी अन्यथा आंदोलन उभारण्याचा इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा कोरपना तालुकाध्यक्ष नारायण हिवरकर यांनी दिला आहे. Bjp
कोरपना तालुक्यात गडचांदूर,अंबुजा, आवाळपूर, नारंडा येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिमेंट उद्योग International quality cement industry आहे. सिमेंट cement वाहतुक करणारी शेकडो वाहने दिवसरात्र याच पुलावरून ये-जा करतात.कमी खर्च,कमी वेळात जिल्ह्याचे ठिकाण गाठण्यासाठी बरेच नागरिक याच मार्गाला पसंती देतात. चक्क पुलाच्या मुख्य प्रवाह असलेल्या ठिकाणीच मोठमोठे खड्डे पडल्याने लहानमोठे वाहन चालकांना पूल पार करणे मोठे जिकरीचे ठरत आहे. भविष्यात होणारी जीवित हानी रोखण्यासाठी सा.बा.विभागाने आठ दिवसाच्या आत पुलावरील खड्ड्यांची दुरूस्ती करावी अन्यथा कोरपना तालुका भाजपाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारू असा इशारा नारायण हिवरकर,गडचांदूर भाजप शहराध्यक्ष सतीष उपलेंचीवार,सं. गां.नि.योजनेचे माजी अध्यक्ष संजय मुसळे, भाजप महामंत्री नथु पाटील ढवस,मनोर कुरसंगे,विशाल गज्जलवार,पुरूषोत्तम निब्रड,कवडू जरिले,अरूण मडावी, उपाध्यक्ष पुरूषोत्तम भोंगळे, किशोर बावणे, नगरसेवक अमोल आसेकर, अनिल कवरासे,शशिकांत अडकिने,माजी सरपंच विजय रणदिवे,संजय चौधरी,दिनेश खडसे, दिपक भोस्कर, भास्कर वडस्कर,गजानन लांडे इत्यादी भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला आहे.
