महात्मा गांधींकडे पर्यावरण योद्धा म्हणून बघा : खासदार बाळू धानोरकर
चंद्रपूर : हिंसाचाराची भावना संपूर्ण जैवविश्वासाठी विनाशकारी आहे. अशा परिस्थितीत आपण प्रथम महात्मा गांधींचे मूलभूत विचार आणि जीवनशैली लक्षात ठेवत आपण गांधीजींना पर्यावरण योद्धा म्हणून पाहण्याची गरज आहे. कारण त्यांच्या विचारधारेमध्ये निसर्गवादी विचार आहे. असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते पर्यावरण संवर्धन व विकास समिती तर्फे आयोजित पर्यावरण सम्मेलन २०२१ या कार्यक्रमात बोलत होते.
Balu dhanorkar
यावेळी आमदार किशोर जोरगेवार, जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राजेंद्र वैद्य, विधानसभेचे माजी उपसभापती मोरेश्वर टेमुर्डे, प्रदेश अध्यक्ष ओबीसी सेल ईश्वर बाळबुधे, डी. के. आरीकर, प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस ऍड. हिराचंद्र बोरकुटे, महिला विंग जिल्हा अध्यक्ष बेबीताई उईके, शहर अध्यक्ष महिला विंग ज्योती रंगारी, राजेश सोलापण, हरीश ससनकर, शालिनी महाकुलकर, वर्षा कोठेकर यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले कि, आज पर्यावरण प्रदूषणाची समस्या गंभीर होत चालली आहे. अशा परिस्थितीत काळजीपूर्वक पर्यावरण वाचवण्याचा प्रत्येकानी प्रयत्न केला पाहिजे. गांधीवाद आपल्याला निसर्गाप्रती करुणेची भावना शिकवतो. जर आपल्याला येणाऱ्या पिढीसाठी पर्यावरणाचे रक्षण करायचे असेल तर गांधींजीनी दिलेल्या मार्गाशिवाय दुसरा मार्ग असू शकत नाही. जर आपण महात्मा गांधींच्या पर्यावरणीय वैज्ञानिक विचाराचा आपल्या मार्गाने अवलंब केला तर आपण केवळ विनाशापासून स्वतःला वाचवू शकणार तसेच जगासमोर एक आदर्श ठेऊ ठेऊ शकू असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी मानले.
महावितरण चंद्रपूर परिमंडळात महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
News 34 Chandrapur
चंद्रपूर - महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी महावितरण MSEDCL chandrapur चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता Chief Engineer श्री. सुनील देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले व मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, अधिकारी व कर्मचारी यांनी राष्ट्रध्वजास मानवंदना अर्पण केली.
मुख्य अभियंता यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी Father of the Nation Mahatma Gandhi यांच्या प्रतिमेस माल्यार्पण केले.चंद्रपूर मंडळाच्या अधि. अभियंता श्रीमती संध्या चिवंडे,चंद्रपूर विभागाचे कार्यकारी अभियंता उदय फरासखानेवाला, सहा.महाव्यवस्थापक श्री. सुशील विखार व वरीष्ठ व्यवस्थापक श्री. आर. एस. बोरीकर, व्यवस्थापक श्री. सुभाष पवार तसेच सर्व उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पंजली अर्पण करून अभिवादन केले.
मुख्य अभियंता श्री. सुनील देशपांडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या सत्य व अहिंसा या मुल्यांवर प्रकाश टाकत या मुल्यांची आजच्या काळात निर्माण झालेली गरज व महत्व पटवून दिले. महात्मा गांधी यांनी ग्राहकांसंबधी व्यक्त केलेले विचार -आमच्याकडे आलेले ग्राहक हे फार मोलाचे आहेत. ग्राहक आमच्यासाठी नसून आम्ही ग्राहकांसाठी आहोत ( महात्मा गांधी ).- हा विचार त्यंानी उपस्थित अधिकारी व कर्मचारी बंधुना विदित करत ग्राहक सेवा चांगल्या प्रकारे देण्याचे आवाहन केले.
आदर्श समाजासाठी गांधी विचार अंगीकारा
महापौर राखी संजय कंचर्लावार यांचे आवाहन : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
चंद्रपूर, ता. २ : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असतानाच आज आपण कोरोना सारख्या महामारीचा सामना करतोय. कोरोना आल्यापासून सर्वाना स्वच्छतेचे महत्व कळले. रोगराईपासून दूर राहायचे असेल तर स्वच्छता असलीच पाहिजे. राष्ट्रपिता महात्मा गांधी हे ही स्वच्छतेचे पुजारी होते. जर कोणी व्यक्ती स्वच्छ नसेल तर त्याचं स्वास्थ ही चांगली राहू शकत नाही, असे गांधीजी म्हणायचे. माणसाने चांगले आयुष्य जगण्यासाठी स्वच्छ राहणे बंधनकारक आहेत. आदर्श समाजासाठी गांधी विचार अंगीकारा, असे आवाहन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी आपल्या संदेशात केले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने शनिवारी (ता. २) राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी आसवानी यांची उपस्थिती होती. मनपा मुख्यालय आणि जटपूरा गेटस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आभिवादन करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेतील विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
घुघुस पोलीस स्टेशन व नगरपरिषदेच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर यांची जयंती साजरी
घुग्गुस पोलीस स्टेशन व नगर परिषेदच्या वतीने 152 वी गांधी जयंती दिनानिमित्त नगरपरिषदच्या मुख्याधिकारी आर्शीया जुही यांनी नगरपरिषद मध्ये व घुग्गुस पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक राहुल गांगुर्डे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस मालार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले.यानंतर नगर परिषदच्या मुख्याधिकारी आर्शीया जुही यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता सर्वक्षण स्वच्छतेचा कार्यक्रम घेण्यात आला.पोलीस स्टेशन येथून चंद्रपूर मार्गावरील प्रियदर्शनी कन्या विद्यालया पर्यत सायकल रैली काढण्यात आली या रैलीत नगरपरिषदचे सर्व कर्मचारी, राजकीय व सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता यानंतर उपस्थित मान्यवराच्या हस्ते वृक्षारोपण Plantation करण्यात आले.यानंतर ठाणेदार राहुल गांगुर्डे व राजु रेड्डी यांच्या हस्ते स्वच्छता कर्मी बट्टू व लक्षमी येरला यांना शाल श्रीफळ व नगदी राशी देऊन सन्मानित करण्यात आले. घुग्गुस शहरात अभिनव कार्यक्रमा घेण्यात आल्यामुळे लोकांमध्ये उत्सहा निर्माण झाला. या कार्यक्रमाला नगरपरिषदचे अभियंता अमर लाड, अभिषेक जांभुळे, विक्रम क्षीरसागर,कर्मचारी सुरेंद्र जोगी, विठोबा झाडें,सुरज जंगम,संदीप मते,शंकर पचारे,रवींद्र गोहोकर, खुशाल घागरगुंडे,मोसम कुरेशी,स्नेहल बहादे,सुप्रिया खोब्रागडे, अशोक रसाळ,सुरेश येरगुराला,भाजपा जिल्हा अध्यक्ष देवराव भोंगळे, BJYM भाजयुमो महाराष्ट्र उपाध्यक्ष विवेक बोढे, घुग्गुस काँग्रेस CONGRESS शहर अध्यक्ष राजु रेड्डी, किसान सेल जिल्हाध्यक्ष रोशन पचारे, साजन गोहणे व कामगार नेते सैयद अन्वर उपस्थित होते.
सत्यमेव जयते चा फलक लावून डेरा आंदोलनातील कामगारांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
235 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर न्यायालयाच्या निर्णयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांना मोठा दिलासा मिळाला.काल कामगारांतर्फे ढोल-ताशाच्या गजरात नृत्य करून गुलाल उधळून व एकमेकाला मिठाई खाऊ घालून विजयोत्सव साजरा करण्यात आला होता.
आज राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आंदोलनकर्त्या कामगारांनी जटपुरा गेट येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ अभिवादन केले.यावेळी जन विकास कामगार संघातर्फे महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांचे छायाचित्र असलेला सत्यमेव जयते चा फलक लावण्यात आला होता. जन विकास कामगार संघाचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्यासह उपस्थित कामगारांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला सुताचा हार पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यानंतर उपस्थित कामगारांना संबोधित करताना देशमुख यांनी न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे सत्यमेव जयते या वाक्यावर जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा विश्वास दृढ झाला तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री या थोर पुरुषांच्या मार्गाने व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य लोकांना त्यांचे मूलभूत हक्क व न्याय मिळवून देणे हाच एकमेव पर्याय असल्याचे नमूद केले. या कार्यक्रमाला जन विकास कामगार संघाचे अनिल दहागावकर,कांचन चिंचेकर,प्रफुल बजाईत, प्रमोद मांगरुडकर ज्योती कांबळे, शेवंता भालेराव, नीलिमा वनकर, रश्मी नगराळे, सुनिता रामटेके, शिला अंबादे, दर्शना झाडे, गीता मुन, अमिता वानखेडे, कविता सागौरे, सपना दुर्गे, भाग्यश्री मुधोळकर, हेमा देशपांडे, सुवर्णा नवले, रमा अलोने, पूजा रामटेके, सीमा वासमवार, छाया पोफारे, उषा सातारडे, बबीता लोडेल्लीवार, मयुरी गांरेडिडवार, , प्रविण अत्तेरकर, मोहन अंधोरे, रामदास लांजेवार, दिवाकर रोहनकर, सागर धामंगे, स्वप्नील शेंडे, रुपेश रडके इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.
आम आदमी पार्टी चंद्रपुर तर्फे गांधी जयंती साजरी
आम आदमी पार्टी चंद्रपूर तर्फ़े आज दिनांक २ ऑक्टोबर २०२१ रोज़ी 11:30 वाजता स्थानिक जटपुरा गेट तसेच गांधी चौक येथे महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांचा प्रतिमेला माल्यार्पण करुण जयंती साजरी करण्यात आली यावेळी. जिल्हा अध्यक्ष श्री सुनिल देवराव मुसळे, कोषाध्यक्ष श्री.भिवराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार, आप पदाधिकारी प्रतिक विराणी ,शहर सचिव राजु कुडे , सोशल मीडीया प्रमुख राजेश चेडगुलवार ,बबन क्रीश्नपल्लीवार , अजय डुकरे ,शाम वांढरे ,दिलीप तेलंग,राजेश पोटे ,करण अतकरे,निखील बारसागडे ,मारोती धकाते तथा ईतर अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी
यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यालयात राष्ट्रपीता महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारतचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती सजारी करण्यात आली. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांची प्रामूखतेने उपस्थिती होती. Young chanda brigade
दरवर्षी प्रमाणे यंदाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने राष्ट्रपीता महात्मा गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमीत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी त्यांच्या कार्यांवर प्रकाश टाकला. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या आदिवासी विभागाचे जिल्हाध्यक्ष जितेश कुळमेथे, राकेश पिंपळकर, रुपेश झाडे, राशिद हुसेन, सायली येरणे, विमल काटकर, अनिता झाडे, शमा काजी, माधूरी निवलकर, गोपी मित्रा, मुन्ना जोगी, बाळकृष्ण जुवार यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.