गडचांदूर :- देश गौरव आत्मनिर्भर भारताचे प्रणेते पंतप्रधान नरेन्द्र मोदी Narendra modi यांच्या जन्मदिन १७ सप्टेंबर ते २ ऑगस्ट हा पंधरवाडा चंद्रपूर भाजपा तर्फे विविध कार्यक्रम, प्रतियोगिता घेऊन साजरा होत आहे.याचाच एक भाग म्हणून २ आक्टोंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यप्रमाणे गडचांदूरात भाजपा कार्यालयात महात्मा गांधी mahatma gandhi व लाल बहादूर शास्त्री lal bahadur shastri यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण, पुजन करून शहराच्या मुख्य मार्गाने तिरंगा रॅली काढण्यात आली.त्यानंतर ग्रामीण रुग्णालय Rural Hospital येथील रुग्णांना फळ वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे जिल्हा सह संयोजक शहर अध्यक्ष सतीश उपलेंचवार, माजी नगरसेवक भाजपा नेते निलेश ताजने,नगरसेवक रामसेवक मोरे, नगरसेवक अरविंद डोहे,महामंत्री हरीश घोरे,संदीपजी शेरकी,जेष्ठ नेते शिवाजी सेलोकर,महादेव एकरे,प्रा.मेहताब शेख, गोपाल मालपाणी,माजी नगराध्यक्षा सौ. विजयालक्ष्मी डोहे,रंजनाताई मडावी, गजानन सिंगरु,गणपत बुरडकर,गजानन चिरडे,भास्कर उरकुंडे,दलीत आघाडी अध्यक्ष प्रशांत खाडे,युवा नेते तुषार देवकर, युवा तालुका अध्यक्ष रोहन काकडे,युवा अध्यक्ष संजय ढेपे,युवानेते कुणाल पारखी, सुयोग कोंगरे,अजी़म बेग,युवा अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष इम्रान शेख व बहुसंख्यने महिला पुरूष उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन सुयोग कोंगरे तर आभार कुणाल पारखी यांनी मानले.
--------------//------------
महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय
गडचांदूर महात्मा गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका स्मिता चिताडे उपस्थित होत्या. Mahatma gandhi college तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे प्रभारी सचिव धनंजय गोरे,उपप्राचार्य विजय आकनुरवार,पर्यवेक्षक अनिल काकडे उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन वामन टेकाम यांनी केले.प्रास्ताविक उपप्राचार्य विजय आकनुरवार यांनी केले तर आभार तुकाराम धुर्वे यांनी मानले.