प्रतिनिधी/संगीता कार्लेकर
चंद्रपूर - पुस्तकाला एका गुरु प्रमाणे मानले जाते. पुस्तक केवळ ज्ञानच देत नाही तर सार्वजनिक जिवणात जगतांना कसे वावरावे याचे संस्कारही पुस्तकातून घडते. त्यामूळे पूस्तक book म्हणजे केवळ पाणांचा संग्रह नसून ते ज्ञानाचे भंडार A storehouse of knowledge आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. Mla kishor jorgewar
शनिवारी जय गुरुदेव अभ्यासीकेत पुस्तक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी अभ्यासीकेचे संचालक अजय माखनवार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
यावेळी पूढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर जिल्हा आता शैक्षणीक क्षेत्रात यशस्वी ठसा उमटवत आहे. युपीएससीच्या upsc परिक्षेत या जिल्हातील चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामूळे जिल्हाचे नाव लौकीक झाले आहे. विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करत असतांना त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आपणही प्रयत्न केले पाहिजे साधारणतः मध्यवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी अभ्यासीकेत येत असतो त्यामूळे अत्यंत अल्पदरात त्याला सदर अभ्यासीकांमध्ये प्रवेश दिल्या गेला पाहिजे या दिशेने माझे प्रयत्न सुरु आहे. बाबुपेठ येथील बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे Barrister Rajabhau Khobragade अभ्यासीकेत आपण 5 लक्ष रुपयांचे पुस्तक व संगणक देण्याची घोषणा केली आहे. गरिबीमुळे कोणाचेही शिक्षण सुटता कामा नये ही आपली भुमिका आहे. याच भुमिकेतून गरिब गरजु विद्यार्थांना To poor needy students निशुल्करित्या उत्तम अभ्यास करता यावा या करिता सर्व सोयी सुविधायुक्त 11 अभ्यासीका तयार करण्याचा माझा संकल्प आहे. यातील चार अभ्यासीकांचे कामही सुरु झाले असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. पूस्तक हे ज्ञान एका पिढीपासून दुस-या पिढी पर्यत पोहचविण्याचे काम करते. त्यामूळे पूस्तकाला गुरु प्रमाणे मानले जाते. पुस्तकामध्ये आपले भविष्य बनवण्याची शक्ती आहे, आणि ते आपल्या जिवनाचा सर्वात महत्त्वपूर्ण भाग असल्याचेही ते यावेळी म्हणाले.