News 34 Bhadrawati
भद्रावती - पावसाळा सुरू होताच पिपरी (देश) तालुका भद्रावती येथील ग्रामपंचायत मार्फत वार्ड नंबर २ आणि ३ मध्ये चिखलमय रस्त्यांवर मुरूम टाकण्यात आला.मात्र वार्ड नंबर १ मध्ये विरोधी पक्षाचे ग्रा. पं.सदस्य असल्यामुळे राजकीय द्वेषामुळे मुरूम टाकण्यात आला नाही. याबाबत वॉर्डातील सदस्यांनी आणि ग्रामस्थांनी सरपंच व उपसरपंच यांना सांगितले असता फक्त आश्वासन देण्यात आले,मात्र अजूनही मुरूम टाकण्यात आला नसल्यामुळे वार्डातील नागरिकांना चिखलातून जाणे येणे करावे लागत आले.
यामुळे घेण्यात आलेली पिपरी(देश) ग्रामपंचायतीची ग्रामसभा विविध समस्यांमुळे वादळी ठरली आणि नागरिकांनी सत्ताधाऱ्यांवर रोष व्यक्त केला.गावातील सरपंच,उपसरपंच आणि सत्ताधारी सदस्यांच्या मतभेदामुळे गावातील नागरिकांना 5 दिवसांपासून पाणी मिळणे बंद आहे.याबाबत सरपंच अर्चना नांदे आणि ग्रामसेवक मोकाडे साहेब यांना निवेदनामार्फत लवकरात लवकर मुरूम टाका अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयात कुलूप ठोकण्यात येईल असा इशारा विठ्ठल अजूनकर,मोहन दर्वे,अविनाश चौधरी,सचिन नांदे,उमाकांत काकडे,योगेश मत्ते तसेच गावातील नगारिकांनी दिला आहे.
