पोम्भूर्णा - पोंभुर्णा येथील एका अल्पवयीन मुलीला 15 ऑक्टोम्बरला चंद्रपुरातील वैभव संदीप कुचनकार याने फूस लावून पळवून नेले.
याबाबत 16 ऑक्टोम्बरला पोंभुर्णा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. Finding minor girl
पोलीसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली, पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने व प्रकरण गंभीर स्वरूपाचे होते करीता या प्रकरणाचा तपास जिल्हा पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखे कडे वळता केला. Minor girl rescue
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी सदर प्रकरणाचा लवकर छडा लागावा यासाठी सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले.
युवक व अल्पवयीन मुलगी नागपूरच्या दिशेने असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यावर पथक नागपुरात पोहचले व आरोपी वैभव ला ताब्यात घेत पीडित मुलीची सुटका करीत चंद्रपूरला आणले.
पुढील तपास पोम्भूर्णा पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आला आहे. Lcb chandrapur
सदरची यशस्वी कामगीरी अरविंद साळवे पोलीस अधीक्षक चंद्रपुर, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पो.नि. बाळासाहेब खाडे स्थानिक गुन्हे शाखा, स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे स.पो.नि.जितेंद्र बोबडे, पोलीस अंमलदार पो.कॉ. व्यंकटेश नलगोंडावार, म.पो.कॉ. हुजबाना पठाण, पो.स्टे . पोंभूर्णा यांनी केली.
