चंद्रपूर - लखीमपूर खेरी येथे झालेल्या शेतकऱ्यांच्या नरसंहार विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीने बंद पुकारला होता.
चंद्रपुरात सुद्धा महाविकास आघाडीच्या बंद ला 100 टक्के प्रतिसाद मिळाला.
मात्र आंदोलनात शहरातील मुख्य बस स्थानक परिसरासमोरील असलेले शिव भोजन केंद्र सुद्धा या आंदोलनातून वाचलं नाही.
महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शिवभोजन केंद्राची तोडफोड केली, सदर बाब शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांना कळताच त्यांनी तात्काळ शिवभोजन केंद्र संचालकांची माफी मागत दिलगिरी व्यक्त केली. Sandip Girhe
सायंकाळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या सूचनेनुसार शिवभोजन केंद्रात जाऊन केंद्र संचालकाला खुर्च्या भेट दिल्या.
शिवसेना जिल्हाप्रमुख गिर्हे यांच्या साधेपणाने केंद्र संचालकही अक्षरक्षा भारावून गेले.
असा जिल्हाप्रमुख पुन्हा होणे नाही ही बाब अनेकांच्या तोंडून निघाली. Shivsena district president chandrapur
आंदोलनात असे अनेक प्रकार घडतात मात्र त्याची नुकसान भरपाई होत नाही, मात्र चंद्रपूर सदर बाबीला अपवाद ठरला व शिव भोजन केंद्रात झालेलं नुकसान त्यांनी भरून दिले.
जिल्ह्यात पहिल्यांदाच शिवसेना इतक्या साधेपणाने वागली, सध्या जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या साधेपणाची चर्चा चंद्रपुरात सुरू आहे.
