प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - बेंबाळं येथील दीपक पा. वाढई यांच्या मातोश्री स्व.कमलाबाई वाढई मुल यांचे दि.24/9/2021रोजी दुःखद निधन झाले, त्याप्रीत्यर्थ दि.8/10/2021ला मा.किशोर भाऊ कन्हेरे म.फुले समता परिषदेचे प्रदेश सरचिटणीस तथा शिवसेना, प्रदेश प्रवक्त्ये महाराष्ट्र, यांनी सांत्वन पर बेंबाळ येथे भेट दिली व म.फुले समता परिषदेचे Samta Parishad संस्थापक अध्यक्ष,तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा ग्राहक संरक्षण मंत्री नाम.छगनराव भुजबळ साहेब यांचे वतीने श्रध्दांजली अर्पण केली.
या प्रसंगी, म.फुले समता परिषदेचे रमेश भाऊ गिरडकर माजी जिल्हाध्यक्ष नागपूर, श्यामभाऊ चौधरी माजी जिल्हाध्यक्ष नागपूर संजयभाऊ सपाटे माजी जिल्हाध्यक्ष चंद्रपुर, जगदीश जुनगरी सर विद्यमान अध्यक्ष चंद्रपुर (दक्षिण),नंदू बारसकर म.फुले समता परिषदेचे जिल्हा सहसचिव चंद्रपुर, सहसंघटक ईश्वर लोनबले , शेतकरी संघटनेचे जिल्हा पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते विवेक मांदाळे, सामाजिक कार्यकर्ते सचिन वाढई बेंबाळ येथील माळी समाज अध्यक्ष विनोद भाऊ वाढई, सचिव दिवाकर गुरूनुले, गाव तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष लवसन वाढई ,दक्षता समितीचे किशोर पगडपलीवार, अशोक आक्केवार व दिपक पाटील वाढई यांचे बंधू, गणेश पा. वाढई, प्रा.धनंजय वाढई व परीवार आणि कार्यकर्ते उपस्थित होते.