चंद्रपूर - 17 सप्टेंबरला देशात भाजपतर्फे पंतप्रधान नरेन्द्र मोदी prime minister narendra modi birthday यांचा वाढदिवस सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत आहे तर दुसरीकडे कांग्रेसने 17 सप्टेंबर हा दिवस राष्ट्रीय बेरोजगार दिवस म्हणून घोषित केला आहे. National unemployment day
2014 पासून देशात बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, आर्थिक दर खाली घसरला, आता बेरोजगारांनी करायचं काय असा प्रश्न मोदी सरकारमध्ये देशातील युवकांना पडला आहे.
चंद्रपुरात युवक कांग्रेसच्या प्रदेश पदाधिकारी शिवानी वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात पंतप्रधान मोदी यांचा वाढदिवस व राष्ट्रीय बेरोजगार दिनानिमित्त अनोखे आंदोलन केले. Youth congress chandrapur
या आंदोलनात बेरोजगार युवकांनी आपली डिग्री 1 ते 10 रुपयांना विकण्यास सुरुवात केली, "डिग्री लो, 1 रुपये मे" शिवानी वडेट्टीवार यांनी या आंदोलनाबद्दल माहिती दिली की मोदी सरकारमध्ये 2014 पासून जे युवक बेरोजगार झाले त्यांची डिग्री विकून त्यामधून जो पैसा मिळेल त्या पैशातून पंतप्रधान मोदी यांना वाढदिवसाचे गिफ्ट घेत त्यांना पाठविणार व त्या भेटवस्तू दिल्यावर मोदींजीना रिटर्न गिफ्ट म्हणून रोजगाराची मागणी करणार आहोत.
शिवानी वडेट्टीवार यांचं आंदोलन आज शहरात चर्चेचा विषय बनला होता.
सदर आंदोलनात जिल्हा युवक कांग्रेसचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
