गडचांदूर :- कोरपना तालुक्यातील सर्वात मोठी व प्रतिष्ठेची मानली जाणारी गडचांदूर नगरपरिषदेने काही दिवसांपूर्वी एका विशेष सभेत येथील प्रभाग क्रमांक ५ मध्ये लांजेकर यांच्या इमारतीत इतर ठिकाणच्या स्थलांतरित देशी दारूचे दुकान liquor store सुरू करण्यासाठी परवानगी दिली.सहा दिवसांपुर्वी सदर दुकान सुरू पण झाले. Shivsena corporater मात्र हे दुकान आमच्या प्रभागात नको, इतरत्र कोठेही हलवा, अशी मागणी करत जिल्हाधिकारी व संबंधितांकडे तक्रार करण्यात आली.तसेच नगरपरिषदेत शिवसेना नगरसेविका सौ.वैशाली सुरेश गोरे यांच्या नेतृत्वात मागील २५ आगस्ट रोजी प्रभागातील महिलांनी स्थानिक नगरपरिषदे समोर एकदिवसीय धरणे आंदोलन व लाक्षणिक उपोषण सुद्धा केले. याच पार्श्वभूमीवर १७ सप्टेंबर रोजी प्रभागातील महिलांनी त्या दारू दुकानापुढे दूध वाटप करून निषेध केला.आंदोलना दरम्यान "दारू नाही दूध प्या.दारू दुकान इथुन हटवा" अशाप्रकारे जोरदार घोषणाबाजी करत जनजागृती करण्यात आली.
------------//---------- milk distribution movement
"आमचा विरोध या देशी दारू दुकानाला यासाठी आहे.कारण की समोर शाळा व वाचनालय आहे,समोर आश्रमशाळेचे काम सुरू आहे,त्यामध्ये सौंदर्यकरण आहे,ग्रीन जिम आहे.दारू दुकानामुळे याठिकाणी दारूड्यांचा बाजार राहणार असल्याची शक्यता नाकारता येत नसून आम्हाला दारू दुकानाचा विरोध नाही,परराज्यातील लोक येथे धंदे करीत आहे तर आपल्या मराठी लोकांनी केले तर यात गैर काय ? आम्हाला कोणाचाही विरोध नाही.यांनी हे दुकान इतरत्र हलवायला पाहीजे एवढीच आमची मागणी आहे.
(शिवसेना तालुका प्रमुख व गटनेता नगरसेवक सागर ठाकूरवार)
-----------//---------
