चंद्रपूर: शासकीय रुग्णालयात रेडीओलॉजी विभागात खूप घोळ सुरू आहे तिथे डॉक्टर कमी पडत असल्याने शासकीय रुग्णालयातील डॉ. मन्सूर चीनी जे खाजगी प्रॅक्टिस करतात ते सात महिन्याच्या गरोदर महिलांना जानेवारी महिन्याची अँपोईमेन्ट देत असल्याचा धक्कादायक प्रकार महिला काँग्रेसने उघडकीस आणला आहे. त्यामुळे सात महिन्याच्या गर्भवती महिलेला जानेवारीची तारीख देत गर्भवती महिले ऐवजी होणाऱ्या बाळाची सोनोग्राफी मोफत करणार का?? असा सवाल गर्भवती महिला आणि त्यांचे नातेवाईक करत आहे.
याबाबतचे वृत्त असे की, डॉक्टर चिनी हे शासकीय रुग्णालयात ऑन कॉल डॉक्टर आहेत. शासकीय रुग्णालयातील एक सोनोग्राफी sonography मशीन बंद आहे. त्यामुळे शासकीय रुग्णालयात government hospital येणाऱ्या गरोदर महिलांची सोनोग्राफी डॉक्टर चिनी आपल्या खासगी रुग्णालयात करतात. त्यावेळी ते सहा, सात, एवढेच नाही तर नऊ महिन्याच्या गर्भवतीला जानेवारी महिन्याची तारीख देतात. त्यामुळे अशा गर्भवती महिलांची सोनोग्राफी ना शासकीय रुग्णालयात होत, ना चिनी यांच्या खाजगी रुग्णालयात. त्यामुळे नाईलाजाने त्यांना खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्याशिवाय पर्याय राहत नाही. या बाबत गर्भवती महिलांच्या तक्रारी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव नम्रता आचार्य- ठेमस्कर प्राप्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या टीम सोबत शासकीय रुग्णालयातील सोनोग्राफी विभागात जाऊन जाब विचारला तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. प्रणाली शेंडे( नाव काल्पनिक) या सात महिन्याच्या गर्भवती या महिलेने महिला काँग्रेसच्या mahila congress chandrapur पदाधिकाऱ्यांकडे याबाबात तक्रार केली त्यानुसार प्रत्यक्ष त्या महिले सोबत शासकीय रुग्णालयात जाऊन या सर्व गोष्टींची शहानिशा करण्यात आली. या बाबतीत माहिती अशी मिळाली की, शासकीय रुग्णालयात डॉक्टर्स मिळणे अवघड होतं आहे त्यामुळे खाजगी डॉक्टरांशी एक प्रकारचा ऑफ द रेकॉर्ड करार करतात. त्यामुळे हे शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आपल्या खाजगी रुग्णालयात काही महिलांची सोनोग्राफी करून देतात. येथील च पुर्णवेळ क्ष कीरण x ray तज्ञ डॉक्टर राठी देखील पाच नंतर शासकीय रुग्णालयात येतात आणि केवळ इतर रुग्णांची सोनोग्राफी करतात. गर्भवती महिलांची नाही, असे का? विचारले असता काहीही कारण कळलं नाही. जानेवारी महिन्याची तारीख का देता? असा जाब नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी डॉक्टर चिनी यांना विचारला असता, आमच्या कडील कोटा अधिक असल्याने असे होत आहे असे उत्तर त्यांनी दिले. शेवटी त्यांनी सदर महिलेची सोनोग्राफी करून दिली पण गरीबांसाठी असलेल्या शासकीय रुग्णालयात खाजगी डॉक्टर अशा प्रकारे वेठीस धरतात हे स्पष्ट आहे. त्यामुळे याबद्दलची तक्रार आपण पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कडे करणार असल्याची माहिती नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी सदर प्रतिनिधी शी बोलतांना दिली. यावेळी नम्रता ठेमस्कर यांच्या सोबत जिल्हा सेवा फाउंडेशनच्या जिल्हाध्यक्षा शीतल कातकर, सेवादल महिला काँग्रेस च्या अध्यक्षा स्वाती त्रिवेदी, लता बारापात्रे यांची उपस्थिती होती.

