चंद्रपूर - कोरोनाचा प्रादुर्भाव Outbreak of corona रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान मंदिरे बंद ठेवण्यात आली होती. याचा परिणाम महाकाली मंदिर Mahakali mandir परिसरातील पूजा सामुग्रीच्या दुकानांवर झाला आहे. त्यामुळे सदर व्यावसायिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. ही बाब लक्षात घेता महाकाली मंदिर परिसरातील दुकान गाळा धारकांचे कर माफ करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या Young chanda brigade वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन त्यांच्या वतीने महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते यांना देण्यात आले आहे. यावेळी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडी अध्यक्ष वंदना हातगावकर, आशा देशमुख, संगीता कार्लेकर, प्रकाश खांडरे, प्रशांत खांडरे, मीरा रामगिरवार, दिपक धात्रप, सुनीबाई कानकाटे, प्रकाश कोठीवाल, संगीता लठ्ठे आदींची उपस्थिती होती.
कोरोना महामारीने अख्या जगात थैमान घातले त्यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवन Daily life मानावर विपरीत परिणाम पडला असून ते आर्थिक संकटातून जात आहे. या काळात सर्व धार्मिक स्थळे आणि त्या अनुषंगिक व्यवसाय, उद्योग धंदे, आस्थापने, प्रतिष्ठाने, लॉकडाऊन मुळे बंद होते. त्यामुळे महाकाली मंदिर परिसरातील लहान व्यावसायिक व त्यावर अवलंबून असणारे इतर कामगार व मजूर वर्ग यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. असे असतांनाही चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने महाकाली मंदिर परिसरातील व्यावसायिकांवर मागील दोन वर्षापासूनचे भरमसाठ कर लादण्यात आले आहे. मात्र आधीच आर्थिक संकट Economic crisis असल्याने मनपा चंद्रपूर तर्फे लावण्यात आलेले हजारो रुपयांचे कर लहान व्यापारी व दुकान गाळा धारक व्यावसायिक भरण्यास असमर्थ आहे. त्यामूळे व्यावसायिकांची आर्थिक अडचण Financial difficulties लक्षात घेता महाकाली मंदिर परिसरातील दुकान गाळा धारकांचे कर माफ करण्यात यावे अशी मागणी सदर निवेदनातून यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने मनपा आयुक्त राजेश मोहिते यांना करण्यात आली आहे. यावेळी दुकान गाळा धारकांचीही उपस्थिती होती.