प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मूल - चंद्रपूर जिल्हा सहकारी बोर्ड मर्यादित चंद्रपूर ची आमसभा आज बोर्डचे अध्यक्ष प्राचार्य ते क कापगते यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, बोर्डआचे उपाध्यक्ष वसंतराव विधाते, संचालक दिलीप कामडी, नलिनी नंदनवार, प्रा स्मिता हांडेकर, जगदिशजी हांडेकर, त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते,बोर्डआचे जिल्हा विकास अधिकारी फालके यांनी इतिवृत्त वाचून कायम केले तसेच सभेचे सूत्रसंचालन केले, बोर्ड कर्मचारी पिंपळकर, तेलंग यांनी आयोजन करत सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पाडली. Chandrapur District Co-operative Board
सभेत सहकारी बोर्डाच्या भविष्यातील विविध कार्याचे नियोजन केल्या गेले, प्रसंगी सहकारी बोर्ड चे अध्यक्ष प्राचार्य ते.क. कापगते यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले, उपाध्यक्ष वसंतराव विधाते यांनी उपस्थिथांचे आभार मानले.