प्रतिनिधी/संगीता कार्लेकर
चंद्रपूर : राज्यात जवळपास सव्वादोन लाख असंघटित व अनोंदणीकृत कृषी व अन्न प्रक्रिया उद्योग आहेत, त्यांना ज्या समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना Pradhan Mantri Micro Food Processing Industry Scheme राबविली जात आहे. याचा लाभ संबंधितांना झाला पाहिजे. यासाठी कृषी विभागाने Agriculture department देखील अत्यंत काळजीपूर्वक लाभार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. या माध्यमांतून या क्षेत्रातील शेतकरी उद्योजक झाला पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत एक दिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
MP BALU DHANORKAR
यावेळी जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, आनंदवन कृषी महाविद्यालय वरोरा प्राचार्य डॉ. अमर शेट्टीवार, कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ. नागदेवते, बँक अधिकारी प्रशांत धोंगडे, जिल्हा समन्वयक तृनाल फुलझेले, नोडल अधिकारी रवींद्र मनोहरे, कृषी विकास अधिकारी दोडके यांची उपस्थिती होती.
ते पुढे बोलताना म्हणाले कि, आपल्या विदर्भात मोठ्या प्रमाणात शेतकरी मेहनत करून शेती पिकवीतात परंतु अस्मानी व सुलतानी संकटामुळे मोठे आर्थिक नुकसान होत असते. या भागातील शेतकरी व बेरोजगार युवक हे व्यवसाय करण्यासाठी भीत असतात. नोकरी करण्यासाठी लाखो रुपये मोजणारे युवक उद्योग उभारण्यासाठी हिम्मत करीत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या योजनेच्या लाभ घेऊन जिल्ह्यातील युवकांनी शेती पूरक उद्योग उभारून आत्मनिर्भर बनण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. त्यासोबतच लाभार्थी बचतगट व शेतकरी उत्पादक कंपन्यांना या योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया व शेतीमाल निर्यात याच्या अभ्यास करून सहभागी होण्याची सुवर्ण संधी आहे. या माद्यमातून शेतीव्यवसायाला सुगीचे दिवस येऊन आर्थिक विकास होण्यास मदत होतील. या योजनेअंतर्गत बँक कर्जासाठी Bank Loan लागणारी कागदपत्रे त्याच प्रमाणे कृषी माळ नियत संधी इत्यादी बाबत माहिती मिळण्याकरिता तालुका स्तरावर कार्यशाळा होणार आहे. सर्वानी लाभ घेण्याचे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले आहे. यावेळी कृषी विभागाकडून एक पोस्टरचे लोकार्पण देखील झाले. अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.