कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
शिक्षक दिनाचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील नांदा येथील ग्रामदुत फाउंडेशनच्या युवकांनी "एक दिवस गावासाठी" उपक्रम राबवला.सदर उपक्रमांतर्गत येथील स्मशानभुमीत स्वच्छता मोहीम राबवून युवकांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. पावसाळ्यात सदर स्मशानभुमीत झाडं झुडुप वाढल्याने नागरिकांना अंत्यविधीसाठी मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत होता.बऱ्याच दिवसांपासून स्मशानभूमीत अस्वच्छता पसरली होती.हे चित्र पाहून ही जागा स्वच्छ करण्याचा मानस गावकऱ्यांचा होता शेवटी शिक्षक दिनी सदर ठिकाणची स्वच्छता करण्यात आली.सदर मोहिमेत ग्रामदुत फाऊंडेशनचे प्रा.रत्नाकर चटप,प्रा.रुपेश विरुटकर, भास्कर लोहबडे,मुरलीधर बोडके,प्रकाश महाराज उपरे,चंदू झुरमुरे,रवी चिंचोलकर, नितीन गिरटकर,रमेश गज्जलवार इत्यादींनी पुढाकार घेतला.
-----------//--------
फाउंडेशनच्या माध्यमातून याआधी गावात वृक्षारोपण करण्यात आले होते.सोबतच राजूरा येथील विवेकानंद अनाथाश्रमात अनाथांना राखी बांधून रक्षाबंधन साजरा करण्यात आला होता.यापुढेही गावात विविध सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जोपासून ग्रामविकासात योगदान दिले जाईल असे मत ग्रामदुत फाऊंडेशनचे प्रकाश महाराज उपरे यांनी व्यक्त केले.
------------//--------