चंद्रपूर/दुर्गापूर - शहरात मागील काही दिवसांपासून गुन्ह्यांचे प्रमाण वाढत असून सध्या ही स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर झाली आहे.
खून, गँगवार ह्या घटना जश्या नित्याच्या झाल्या आहे, या गुन्हेगारी वृत्तीवर आधीच नियंत्रण करणे गरजेचे आहे, अन्यथा पुढचा काळ कसा असेल सांगता येत नाही. Durgapur police chandrapur
दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत चोरीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे.
पहिली घटना पी.कुमार बार समोरील आयुशनगर येथे घडली सदर घटनेत सोनसाखळी Gold chain चोरणारे 2 आरोपी दुर्गापूर पोलिसांच्या हाती लागले असून त्याचेंजवळून 11 ग्रॅम वजन व 55 हजार रुपये किमतीची सोनसाखळी, 2 मोबाईल किंमत 9 हजार असा एकूण 64 हजार रुपयांचा मुद्देमाल सहित 32 वर्षीय नितीन अशोक बोरकर, 28 वर्षीय पवन साइराज सोनपिपरे दोघेही राहणार पंचशील नगर, उर्जानगर यांना अटक करण्यात आली आहे. theft
दुसऱ्या घटनेत सुमित्रानगर तुकूम येथून दुचाकी वाहन two wheeler bike क्रमांक Mh34 Ak 8289 किंमत अंदाजे 45 हजार चोरी गेली होती.
पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता छत्रपती नगर तुकूम येथे राहणारा आरोपी सुशील मुनेश्वर खोब्रागडे याने 14 सप्टेंबरला सदरील दुचाकी चोरी केली असल्याचे कबूल केले.
पोलिसांनी आरोपी सुशील ला अटक करीत चोरी गेलेली दुचाकी जप्त केली आहे.
दोन्ही घटनेत 3 आरोपी कडून 1 लाख 9 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक स्वप्नील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनी प्रवीण सोनोने, पोलीस कर्मचारी सुनील गौरकार, अमोल घोरुडे, मंगेश शेंडे, किशोर वलके, अशोक मंजुळकर यांनी यशस्वीपणे पार पाडली.
