चंद्रपूर - एकतर्फी प्रेमातून बळी गेलेल्या वैष्णवी ला न्याय मिळावा या मागणीसाठी बाबूपेठवासी व चंदा वैरागडे यांनी जिल्हाधिकारी व आमदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली.
9 सप्टेंबरला महाकाली मंदिर परिसरात वनश्री आंबटकर या मुलीवर प्रफुल आत्राम ने एकतर्फी प्रेमातून प्राणघातक हल्ला केला होता, या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या वनश्रीचा 12 सप्टेंबरला मृत्यू झाला.
याला जबाबदार आरोपी प्रफुल आत्राम ला फाशीची शिक्षा व्हावी Hang the killer अशी मागणी बाबूपेठ वासी करीत असून आतापर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक, आमदार व खासदार यांच्याकडे दाद मागितली आहे.
आमदार प्रतिभा धानोरकर व जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांना दिलेल्या निवेदनात आरोपी आत्राम ला फाशीची शिक्षा Vanashree Ambatkar, प्रकरण लवकर मार्गी लागावे यासाठी सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात Fast Track Court चालविण्यात यावे, आंबटकर परिवारातील एका सदस्याला नोकरी, 1 सप्टेंबरला मृतक वनश्री ने आरोपीविरुद्ध केलेल्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन करावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी चंदा वैरागडे, डॉ. अभिलाषा गावतुरे, अश्विनी खोब्रागडे, संगीता अमृतकर, सुवर्णा भसारकर आदींची उपस्थिती होती.
