चंद्रपूर/भद्रावती - शिवसेनेतुन कांग्रेस पक्षात एन्ट्री करीत लोकसभा निवडणुकीत दिग्गजांना हरवून राज्यात कांग्रेसचे एकमेव खासदार म्हणून बाळू धानोरकर Balu Dhanorkar यांचा विजय झाला.
मात्र त्यांचं शिवसेना प्रेम अजूनही कमी झालेले दिसत नाही, विधानसभा निवडणुकीत बाळू धानोरकर यांनी आपल्या पत्नीला वरोरा विधानसभा क्षेत्रातून उमेदवारी देत विजयश्री मिळविला मात्र वरोरा विधानसभा क्षेत्रात असलेल्या वरोरा व भद्रावती नगरपरिषदेत शिवसेनेचे संख्याबळ असतांना त्यांनी सर्व नगरसेवकांना कांग्रेस मध्ये खेचण्याचा प्रयत्न केला.
यासाठी भद्रावती येथे 16 सप्टेंबरला भव्य प्रवेशाचा कार्यक्रम सुद्धा ठेवला, मात्र मागील 25 वर्षांपासून भद्रावती नगरपरिषदेत आपली सत्ता राखणाऱ्या शिवसेना नगरसेवकांनी ऐनवेळी खासदारांना चपराक दिली.
जम्बो प्रवेश कार्यक्रमाला कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले Nana Patole देखील उपस्थित राहणार होते मात्र महाविकास आघाडी मध्ये फोडाफोडीचे राजकारण नकोच म्हणून त्यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
कांग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रमात भाजपचे 3 नगरसेवक, वरोरा येथील शिवसेनेचे 7 नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा, भद्रावती येथील सभापती सह सदस्य, 30 सरपंच असा पक्षप्रवेश झाला, मात्र खासदार धानोरकर यांनी महाविकास आघाडीच्याया धर्माचे पालन न केल्याचा त्यांच्यावर ठपका लागला.
भद्रावती नगरपरिषद मागील 25 वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे, असे असतांना त्यांनी एकदिवस आधीच भद्रावती येथील 16 नगरसेवक कांग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू केली, शिवसेना चंद्रपूर जिल्हासंपर्क प्रमुख प्रशांत कदम, जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे व जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांना जेव्हा ही बाब कळली त्यांनी तात्काळ भद्रावती येथे तळ ठोकत नगरसेवकांसोबत चर्चा केली.
याबाबत संपूर्ण माहिती वरिष्ठांना सुद्धा सांगितली.
मात्र दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अनुपस्थिती महाविकास आघाडीत फोडाफोडीचे राजकारण नको असं संदेश देऊन गेली.
यावेळी संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांनी वरोरा नगरपरिषदेतील 7 नगरसेवकांवर पक्षश्रेष्ठीं कारवाई करणार असून पुढे होणाऱ्या वरोरा नगरपरिषदेतं शिवसेना shivsena आपला गड राखण्यात यशस्वी होणार असा विश्वास व्यक्त केला, भद्रावती नगरपरिषदेतील 16 नगरसेवकांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्या सोबत न जाता आपला प्रामाणिकपणा सिद्ध केला आहे, खासदार धानोरकर यांनी महाविकास आघाडीच्या धर्माचे पालन न केल्याने आता वरिष्ठ त्यांच्यासोबत चर्चा करतील असेही यावेळी सांगितले.
