कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गोपाल भारती यांची नुकतीच भद्रावती येथे बदली झाली.त्यांच्या जागी सत्यजित आमले हे १० दिवसापुर्वीच ठाणेदार police inspector म्हणून रूजू झाले.गडचांदूर परिक्षेत्रात सूरू असलेली सट्टापट्टी, कलब,सुगंधित तंबाखू विक्री, हायप्रोफाईल जुगार High profile gambling अशा अवैध धंद्यांवर अंकुश लावण्याचे आवाहन ठाणेदारापुढे उभे आहे.आता ठाणेदार यांचे मुस्के आवळणार ? की परिस्थिती जैसे थेच राहणार ? असे एकना अनेक प्रश्न नागरिकांना भेडसावत असल्याने "काय राव ठाणेदारावर भरोसा नाय काय ?" तत्कालीन ठाणेदारांनी काय केले,काय नाही केले,हे पाहण्यापेक्षा आता नवीन ठाणेदार काय कामगिरी दाखवतात,हे पाहणे महत्वाचे,असे धीरयुक्त सल्ले नागरिक एकमेकांना देताना दिसत आहे.
सध्याची परिस्थिती पाहता गडचांदूर परिक्षेत्राचा धावता आढावा घेतला तर गडचांदूर येथील आठवडी बाजार, नांदाफाटा येथील नांदा बिबी रोड लगत दारू दुकाना समोर एका खोलीत मागील आठ दिवसांपासून खुलेआम,बिनधास्तपणे सट्टापट्टी सुरू आहे.गडचांदूर शहारात बऱ्याच किराणा,कन्फेशनरी,पान मटेरिअलच्या दुकानात सुगंधित तंबाखूची विक्री होताना दिसत आहे. लाखोंचे हप्ते पोलीसांना देत आहो म्हणून हे धंदे सुरू आहे अशी माहिती एका दुकानदाराने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली असून यात खरे काय आणि खोटे काय ? हा मात्र संशोधनाचा विषय बनला आहे.तसेच दारूबंदी उठल्यानंतरही अंबुजा फाटा ambuja येथे अवैध दारूची विक्री सुरू आहे.गडचांदूर भोयगाव मार्गावरील काही टायर पंक्चरच्या दुकानात अवैध डिझेल साठवणूक करून इतर ठिकाणी विक्री केली जात आहे. गडचांदूर येथे एकाठिकाणी क्लब मध्ये हाय प्रोफाईल जुगार Gambling खेळले जात आहे.नवीन ठाणेदारांना कदाचित यासंबंधीची माहिती नसावी ? तसेही अधिकाऱ्यांचा(काही अपवाद वगळता)मागेपुढे करणारी, लोटांगण घालणारी,चापलुसी करणारी ती टोळी फुकटचे सल्ले व मार्गदर्शन करण्यासाठी सक्रिय होताना दिसत असून यात नवीन ठाणेदाराची भुमिका म्हत्वाची ठरणार आहे.असे असताना ते लवकरच गडचांदूर परिक्षेत्रातील सर्व अवैध व्यवसायिकांचे मुसके आवळून परिक्षेत्र अवैध धंदे मुक्त करतील ? अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करताना दिसत आहे.मात्र ही अपेक्षा पुर्ण होणार की,भंग होणार ? हे मात्र येणारा काळच ठरवेल हे तेवढेच खरे.